Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

माई साहेब सिंधूताई सपकाळ यांचे फैजपूरशी असलेले ऋणानुबंध कायम आठवणीत :- नरेंद्र नारखेडे

  माई साहेब सिंधूताई सपकाळ यांचे  फैजपूरशी असलेले ऋणानुबंध कायम आठवणीत :- नरेंद्र नारखेडे  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  ...

 माई साहेब सिंधूताई सपकाळ यांचे  फैजपूरशी असलेले ऋणानुबंध कायम आठवणीत :- नरेंद्र नारखेडे 


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 हजारो अनाथ निराधार मुला मुलींना आई चे प्रेम देणाऱ्या अनाथांची माय झालेल्या माई साहेब सिंधुताई सपकाळ यांचे फैजपूर शहराशी असलेले ऋणानुबंध व भावनिक नाते फैजपूर कर कधीच विसरणार नाही त्या आमच्या कायम आठवणीत आहे असे भावनिक उदगार फैजपूर येथील सहकार भारती जिल्हा अध्यक्ष व सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी सिंधुताई सपकाळ यांचे शिरूर जिल्हा पुणे येथील अनाथ आश्रम तथा ग्लोबल मदर फाऊंडेशन येथे निराधार मुलांना भेटीचे प्रसंगी भावना व्यक्त केल्या  सिंधू ताई यांनी आता पर्यंत सुमारे २१०० चे वर मुला मुलींचे मातृत्व स्वीकारून त्यांचे बाल संगोपन करून त्यांनी उच्च शिक्षण देऊन समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले सुमारे ३०० मुलींचे विवाह सोहळा करून त्यांचे जीवन उभे केले ४०० गायीचा सांभाळ केला आणि हे सर्वकार्य समाजातील उदार लोकांचे मदतीने सुरू आहे  कोणतेही सरकारी अनुदान नाही  मुलांची संख्या वाढली आहे यांची व्यवस्था होणे साठी शिरूर येथे शाखा सुरू केली आहे या साठी सोलापूर येथील वासुदेव व्हटकर यांनी १५ हजार चौरस फूट जागा दान केली आहे  या जागेवर ३०० विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृहाचे बांधकाम सुरू केले आहे यासाठी फैजपूर हुन आर्थिक मदत केली जाईल अशी माहिती 

 याप्रसंगी नरेन्द्र नारखेडे यांनी उपस्थित व्यवस्थापन मंडळास  दिली  यापूर्वी ही फैजपूर नागरिक यांनी खुप मोठी मदत व कोरोना काळात  सातपुडा अर्बन सोसायटी  श्री लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था  देविदास टिकाराम चौधरी पतसंस्था व नरेन्द्र नारखेडे मित्रमंडळी यांनी केलेली आर्थिक मदतीचा कृतज्ञातापूर्वक उल्लेख अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ व सहकारी यांनी यावेळी केला सिंधूताई सपकाळ यांचे निधनानंतर हे कार्य ममता ताई सपकाळ  विनय सपकाळ चालवत आहे  यावेळी सर्व निराधार अनाथ मुलांना भेटून चर्चा करून  हितगुज केले याप्रसंगी  व्यवस्थापक सचिन ढोरमले अधीक्षक मीनाक्षी लतांबळे सह व्यवस्था पक पायल तायडे भाऊसाहेब मांडले दत्ता जाधव अक्षय खरमाळे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ हे उपस्थित होते यांनी नरेंद्र नारखेडे व समवेत असलेले विशाल सुभाष इंगळे पुणे यांचे स्वागत केले  व सर्व नवीन कार्याची माहिती दिली  समाजातील दानशूर। व्यक्तींनी या वसतिगृह इमारत बांधकामास उदारहस्ते मदत करावी असे आवाहन नरेंद्र नारखेडे यांनी केले आहे

No comments