आसेमं आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा तालुका ...
आसेमं आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा तालुका रावेर येथील नगरपालिकेच्या प्रभाकर बुला महाजन बहुउद्देशीय सभागृहात आज दि. 11 मे 2025 रोजी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संचलित अविरत 28 वा तडवी भिल समाज सामुहिक विवाह सोहळ्यात 10 जोडप्यांची रेशीम गाठ बांधली गेली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सावदा येथील नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेड़े सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील मुंबई चे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी राजू अमीर तडवी मासूम रहीम सेवानिवृत्त डिवाय एसपी रसीद तडवी पीएसआय अमोल गर्जे, डायमंड शाळेचे अध्यक्ष डॉ.शेख हारूण.आदी मान्यवर उपस्थित होते.
या सामुहिक विवाह सोहळ्यात समाजातील 10 वधूवरांचे विवाह मौलवी कडून लावण्यात आले. वधू वर यांना माध्यमिक शिक्षक गनी बिस्मिल्ला तडवी यांचे तर्फे प्रत्येक जोडप्यांना संसारोपयोगी भांड्यांचा सेट, नाशिक येथील उद्योजक आझाद हैदर तडवी यांचेकडून कुकर सेट रज्जाक तडवी सरपंच यांनी घड्याळ भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी राजेश वानखेडे यांनी आपले मनोगतात सांगितले की तडवी भिल समाजाचा हा आदर्श विवाह सोहळा असून आजतागायत 1840 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत व आज 10 जोड्या विवाहबद्ध होऊन 1850 विवाह लावण्याचा विक्रमी ध्येय संकल्प पुर्ण करणे हा आसेमं आदिवासी सेवा मंडळाचे उत्कृष्ट कामगिरी आणि कौतुकास्पद कार्य असल्याचे ते म्हणाले तर सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी आजच्या काळात लग्न सोहळ्यात अवाजवी वायफळ अमाप पैसा खर्च न करुन समाजातील नववधु वरांचे एका छताखाली कमी पैशात व सर्व समाज मान्यवरांच्या उपस्थितीत सामुहिक विवाह सोहळ्यात लग्न विधी पार पडणे ही काळाची गरज आहे आणि असे आदर्श विवाह सोहळा कार्यक्रम सर्वांनी आयोजित करावे तसेच आदिवासी समाजातील तरुणांना शिक्षणाकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले
समाजासह विविध समाजातील समाजसेवक व्यक्तींच्या संघटनेचे पदाधिकारी यांचे आवडीने स्वेच्छेने कोणतीही देणगी न मागता स्वेच्छा मदत घेत सामुहिक विवाह सोहळा सलग २७ वर्षांपासून अविरत अबाधित सुरू आहे. हा समाजाचा आसेमं प्रती असलेले प्रेम असल्याचे प्रतिपादन आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी यांनी बोलताना सांगितले.
यावेळी सामुहिक विवाह सोहळ्याचे समापन समयी आसेमं आदिवासी सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी आदिवासी क्रांतिकारक तंट्यामामा भील जननायक बिरसामुंडा यांच्या प्रतिमा डोक्यावर घेत आदिवासी गीतावर सर्व आसेमं परिवार चे पदाधिकारी यांनी आदिवासी नृत्य केले.
विवाह सोहळा आयोजक आसेमं संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी, जिल्हाध्यक्ष मुबारक अलीखा तडवी प्रदेशाध्यक्ष कामील नामदार तडवी, कर्मचारी महासंघ प्रदेशाध्यक्ष ईरफान तडवी, अनिल नजीर तडवी, या प्रसंगी रोशन हसन तडवी महावितरण तसेच महसूल प्रशासनाचे आणि हनिफ तडवी यांच्या सेवानिवृत्ती सत्कार यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला सामूहिक विवाह सोहळा यशस्वी असे आदिवासी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू बिऱ्हाम, अल्लाउद्दीन तडवी, श कामिल तडवी जिल्हा अध्यक्ष मुबारक अलीखा तडवी अनिल नजीर तडवी कर्मचारी महासंघाचे इरफान तडवी सर युवक जिल्हाध्यक्ष बिराज तडवी पो पा समिती रईस तडवी अशरफ तडवी ठाकूर दादा सत्तार तडवी मुबारक गुरुजी वसीम महेबुब सद्दाम तडवी मुनाफ तडवी मायकल तडवी
समशेर मिस्त्री डॉक्टर लूकमान तडवी गनी तडवीसर युनूस तडवी अश्रफ तडवी आप्पा सिराज तडवी सर मुसा तडवी गुरुजी असलम सलीम मुसा तडवी न्याजोद्दीन तडवी
, पो कॉ निलेश बाविस्कर पो कॉ अफजल तडवी पो कॉ मयूर पाटील,पो कॉ समीर तडवी, पो कॉ मनोज तडवी
यांनी सहभाग घेतला तर आसेमं आदिवासी सेवा मंडळ परिवार सदस्यांनी सामुहिक विवाह सोहळा यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.


No comments