चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दित 1,18,600 चा गांजा जप्त चोपड़ा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि ०७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुम...
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दित 1,18,600 चा गांजा जप्त
चोपड़ा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि ०७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हातेड गावा लगतच्या शिवारात शिरपुर ते चोपडा जाणारे रोडवर युग पेट्रोल पंपा समोर रोडावर आरोपी प्रल्हाद केवजी बारेला वय. ४० रा.वर्डी ता. चोपडा हा इसम आपल्या ताब्यातील सिल्वर काळे व निळे रंगाची टी व्ही एस कंपनीची स्कुटी मोटर सायकल क्रमांक एम एच 12 एफ एक्स 2643 ह्या गाडीवर ओला हिरव्या बिया असलेला गांजा पोलिसांच्या सापळयात वाहतूक करताना अडकविले आणि ताब्यात घेतले.आरोपी कड़े एक मोटरसायकल तसेच 6,000/- रु कि चा रेडमी A2 कंपनीचा मोबाईल त्यामध्ये ऐअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला 400/- रु रोख रक्कम त्यामध्ये 100 रुपये दराच्या चार चलनी नोटा एकूण 1,45,000 मुद्दे माल जप्त करण्यात आले.
पो.कॉ.गजानन मच्छिद्र पाटील यांच्या फिर्यादीवरुन चोपडा ग्रामीण पो.स्टे (भाग ६) गुर.न. १५६/२०२५ गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे अधिनियम १९८५ चे कलम २० (ब), २२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले. पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास होत आहे.

No comments