राष्ट्रीय महामार्ग क्र.६ कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी जळगाव प्रतिनिध...
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ कालिका माता परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पोलीस चौकी उभारण्यात यावी, मनसेची आग्रही मागणी
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे आग्रही मागणी करण्यात आली आहे कि रा.म. क्र. ६ कालिका माता परिसरात होणारे एक्सीडेंट तसेच घातपात, अवैध धंदे सुरू असल्याने त्या ठिकाणी लवकर पोलीस प्रशासन पोहोचत नाही. त्यासाठी रा.म. क्र. ६ कालीका माता परिसरात एक पोलीस चौकी उभारण्यात यावी त्यामुळे होणारे अपघात कमी होऊन बेशिस्त ट्रॅफिकला आळा बसेल. अशी मागणी करण्यात आली असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
पोलीस अधीक्षक साहेब हे जरूर या निवेदनाची दखल घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे व लवकरात लवकर या ठिकाणी पोलीस चौकी उभी राहील, अशी आम्ही आपणाकडून अपेक्षा करतो निवेदन देतेवेळी मनसेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील भाई देशपांडे, शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, जिल्हा संघटक राजेंद्र निकम, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,चेतन पवार, खुशाल ठाकूर, प्रकाश जोशी, राहुल चव्हाण, ऐश्वर्या श्रीरामे,विकास पाथरे, संदीप मांडोळे, विलास सोनार, विवेक खांबेत, सतीश सैंदाणे व आदी.उपस्थित होते.

No comments