adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मलकापूरकर खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर 14 सुवर्णपदकांची कमाई तर 6 खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

 मलकापूरकर खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर 14 सुवर्णपदकांची कमाई तर 6 खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:...

 मलकापूरकर खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर 14 सुवर्णपदकांची कमाई तर 6 खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मलकापूर : इंडियन पॅसिफिक फेडरेशन च्या वतीने आयोजित ८ वी "राष्ट्रीय पावर लिफ्टिं स्पर्धा" मॉस स्टेडियम, रायवाला, हरिद्वार उत्तराखंड येथे दिनांक ११ ते १४ मे २०२५ ला पार पडल्या. या स्पर्धेत देशभरातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.

 इंडियन पॅसिफिक स्पोर्ट्स फेडरेशन महाराष्ट्रच्या संघात ३४ खेळाडू मुले व मुली या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यात बुलढाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत मलकापूर येथील १८ खेळाडू मुले व मुली महाराष्ट्र संघात सहभागी झाले होते.त्यात १४ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करीत सुवर्ण पदकांना गवसणी घातली.

  १९ वर्षाखालील मुली

१)४३ किलो मधून कु.कांचन विजय वानखेडे प्रथम

२)५२ किलो मधून कु.मयुरी गोपाल इंगळे प्रथम

३)५७ किलो मधून कु.पूजा गोपाल कल्याणकर प्रथम

२३ वर्षाखालील मुली

४)५२ किलो मधून कु.साक्षी उल्हास आगळे प्रथम

५)५७ किलो मधून कु. दिक्षा मोहन खराटे प्रथम

१४ वर्षाखालील मुले

१)५९ किलो मधून ध्रुव शरद काळे प्रथम

१७ वर्षाखालील मुले

 १)५९ किलो मधून केशव रामेश्वर डोंगरे प्रथम

२)६६ किलो मधून सुरज शांताराम कोळसे प्रथम

३)८३ किलो मधून विवेक विशाल धनवे प्रथम

१९ वर्षाखालील मुले

 १)८३ किलो मधून ओम सीताराम हांडे प्रथम

२)२३ वर्षाखालील मुले ८३ किलो मधून आनंद संताजी शिंदे प्रथम

३)१०५ किलो मधून विनय जयंता पाटील प्रथम

४)१२० किलो मधून सचिन रामभाऊ राणे प्रथम

मास्टर 1 पुरुष गटातून

१) १०५ किलो मधून अश्विन सतीश लोखंडे प्रथम असे एकूण १४ सुवर्ण पदके मिळविले

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पूजा गोपाळ कल्याणकर, साक्षी उल्हास आगळे, सचिन रामभाऊ राणे, आनंद संताजी शिंदे, ओम सीताराम हांडे, विनय जयंता पाटील,विवेक विशाल धनवे यांची पोखरा, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

==================

 खेळाडूंच्या कौशल्यामध्ये सुधारणा करणे आणि त्यांना राज्य,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करणे हे प्रशिक्षकांचे कार्य असते.प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करतात, त्यांचे प्रशिक्षण व्यवस्थापित करतात आणि संघाला एकत्र ठेवतात. ते खेळाडूंना विविध तंत्र आणि युक्त्या शिकवतात, तसेच त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतात. प्रशिक्षकांचा अनुभव आणि ज्ञान खेळाडूंच्या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. माझा खेळाडू मेहनती व नेहमीच किर्तिमान राहिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तो यश मिळवून बुलढाणा जिल्ह्याचे व आमच्या"ग्रुप ऑफ लिफ्टर्स मलकापूर" या संघटनेचे नाव उंचावेल हा माझा विश्वास आहे.

           --- रामा प्रकाश मेहसरे प्रशिक्षक.

=================

        या विजया मुळे मलकापूर नगरीचे व आपल्या जिल्ह्याचे नावलौकिक केले या विजयी खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय त्यांचे माता पिता व प्रशिक्षक श्री रामा प्रकाश मेहसरे यांना दिले. सर्व विजयी खेळाडूंचे सूर्यकांत उंबरकार सर, चंद्रकांत साळुंखे सर, अनिल इंगळे सर, गणेश पेरे सर, कार्तिक पोते सर, विक्रांत नवले सर, उमेश हिरुळकर सर, रणवीरसिंह राजपूत सर, स्वप्नील साळुंखे सर यांनी अभिनंदन केल.

No comments