सावदा न.पा. रुग्णालयाला छत्रपतीं शिवाजी महाराजांचे नाव द्या. शिवप्रेमी भाजप-शिवसेनेचे लक्षणिक उपोषण आ.चद्रकांत पाटील व आ.अमोल जावळे यांच...
सावदा न.पा. रुग्णालयाला छत्रपतीं शिवाजी महाराजांचे नाव द्या. शिवप्रेमी भाजप-शिवसेनेचे लक्षणिक उपोषण
आ.चद्रकांत पाटील व आ.अमोल जावळे यांचे आश्वासनानंतर उपोषणाची सांगता
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा येथील नगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज नाव देण्यात यावे.या प्रमुख मागणीसाठी स्थानिक भाजपा-शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दि.१९ मे २०२५ रोजी ग्रामीण रुग्णालय समोर,स्टेशन रोड येथे उपोषण सुरू केले होते. उपोषणस्थळी मुक्ताईनगर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील व रावेर यावल मतदार संघाचे आ.अमोल जावळे या दोन्ही आमदारांनी उपोषणार्थींची भेट घेतली व रुग्णालयाचे नामकरणाचा विषय मार्गी लावण्याचे उपोषण कर्त्यांना आश्वासन दिले
याबाबत अधिक माहिती अशी की,सन २०१० मध्ये या रुग्णालयासाठी जागा वर्ग करणे बाबत पालिकेत सर्व अनुमते मंजूर केलेल्या ठराव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्याची अट घातली होती.तरी दोन वर्ष उलटूनही सदर रुग्णालयाला छत्रपतींचे नाव देण्यास जिल्हा शालेय चिकित्सक(सिव्हिल सर्जन)सह संबंधित अधिकाऱ्यांनी"कोणत्याही शासकीय इमारतीला महापुरुषांचे नाव न देण्याच्या सन २०१२ च्या शासन निर्णय" मागे लपून की,छत्रपतींच्या नावाचे त्यांना वावडे असल्याने शिवप्रेमींच्या सदरील मागणीकडे आजतागायत त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.तरी रुग्णालयाला छत्रपतींचे नाव देण्यात यावे या रास्त मागणीसाठी भाजप-शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदरील लक्षणिक उपोषण पुकारले होते.याची दाखल घेऊन उपोषण ठिकाणी कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील,आ.अमोल जावळे यांनी भेट दिली.व भ्रमणध्वनीद्वारे जिल्हा सिविल सर्जन,जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांच्याशी चर्चा केली असता छत्रपतींचे नामकरणाचा नविन प्ररस्ताव पालिका मार्फत मंजुरीसाठी पुन्हा सादर करण्याचे सांगितले.याप्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,हेमांगी चौधरी,माजी उपनगराध्यक्ष शाम अकोले,शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी,भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे,माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, समाजसेवक सोहेल खान,शेख कमरोद्दीन,मोईन खान सह असंख्यने भाजप-शिवसेना महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments