adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई तब्बल 14 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

  जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई तब्बल 14 कोटींचे अंमली पदार्थ जप्त   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- ...

 जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई तब्बल 14 कोटींचे अंमली पदार्थ जप्त  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१५):- अहिल्या नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी तब्बल 13 कोटी 75 लाख 41 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की एका छोटा हत्ती टेम्पो मधून अमली पदार्थाची वाहतूक होणार आहे. 


त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना खात्री करून कारवाई करण्यास सांगितले. पोलीस पथकाने दिघी खंडाळा रोडवर सापळा रचून थांबले असताना एक क्रीम कलरचा टेम्पो पथकाला येताना दिसला त्या टेम्पोला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी पावडर व स्फटिक आढळले. या मुद्देमालाबाबत वाहन चालकाकडे विचारणा केली असता त्यानी सदरील माला हा विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांनी दिला असल्याचे सांगितले. मिनीनाथ विष्णू राशिनकर रा. राहता जिल्हा अहिल्यानगर, विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे, यांच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग बसवराज शिवपुजे,यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख,सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव,पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे,पोना.किशोर औताडे, सोमनाथ मुंडले,संपत बडे, संभाजी खरात,मच्छिंद्र कातखडे,अमोल पडोळे,अजित पटारे,अकबर पठाण,आजिनाथ आंधळे, राहुल पोळ,रमेश रोकडे, झिने,राजेश सूर्यवंशी,बाळासाहेब गिरी,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस अंमलदार नितीन चव्हाण,रवींद्र बोडखे,अमोल नागले,नितीन शिरसाट,दिलीप कुऱ्हाडे,अश्विनी पवार यांनी केली आहे.

No comments