श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे सन 2000/01 च्या इ. 10 वी बॅच चा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत ...
श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे सन 2000/01 च्या इ. 10 वी बॅच चा गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
श्री शिवाजी हायस्कूल हातेड येथे सन 2000/01 च्या इ. 10 वी बॅच चा गेट टुगेदर चा कार्यक्रम दि 11/05/2025 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तात्यासो दिलीपराव सोनवणे सर तसेच प्रमुख उपस्थिती श्री भाऊसाहेब आर. एच. बाविस्कर सर, श्री. खाचने सर, श्री. एच. बी. बोरसे सर, श्री. पी. आर. बाविस्कर सर, श्री. एस. बी. सोनवणे सर, श्री. जे. एच. पाटील सर, व्ही. बी. बाविस्कर सर, श्रीमती. उषाबाई बाविस्कर मॅडम, श्रीमती. सुनंदा शिंदे मॅडम शिक्षेतर कर्मचारी श्री. सुरेश नाना, श्री. शिवाजी सोनवणे, श्री. हंसराज सोनवणे (बंडू दादा) श्री. शालिग्राम सोनवणे (आबा) यांची उपस्थिती होती तरी सन 2000/01 च्या बॅच चे संपुर्ण माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वरस्वती पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच पूलवामा, पहलगाम हल्ल्यातील बळी गेलेल्या नागरिकांना आपल्या देशातील शहीद जवानांना व दिवंगत शाळेचे शिक्षक यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षकांचे व शिक्षेतर कर्मचाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
व श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची चांदीची प्रतिमा भेट म्हणुन देण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वागतगीत सौं. अश्विनी सोनवणे व वैशाली सनेर यांनी सादर केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. अश्विनी सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. संदिप सनेर व संदिप बाविस्कर यांनी केले,
श्री. आर. एच. बाविस्कर सर, श्री. पी. आर. बाविस्कर सर यांनी आपलें मनोगत व्यक्त केले तर विद्यार्थींन मधुन श्री. प्रफुल्ल सोनवणे, महेंद्र बाविस्कर, भुषण पाटील, रोहित वानखेडे सौं. अश्विनी सोनवणे, सौं. सुनीता सोनवणे, सौं. राजश्री सनेर यांनी आपलें मनोगत व्यक्त केले श्री. तात्यासो दिलीपराव सोनवणे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले.
कार्यक्रमानंतर सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमामुळे सर्वांना बालपणीच्या आठवणी जागी झाल्यात पुन्हा भविष्यात असाच कार्यक्रम घेण्याचे सर्वानुमते ठरले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. संदिप सनेर, श्री. पंकज देसले, श्री. भुषण पाटील यांनी मेहनत घेतली तसेच शिक्षेतर कर्मचारी यांनी ही खुप मेहनत घेतली. अशारीतीने कार्यक्रमाची सांगता झाली.




No comments