adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार.

  महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार.  अमळनेर (प्रतिनिधी ) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) म...

 महाराष्ट्र दिनानिमित्त शिवश्री बापूराव ठाकरे सर यांना महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार. 


अमळनेर (प्रतिनिधी )

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र गौरव सन्मान पुरस्कार सोहळा. नासिक येथे सुप्रीम ह्यूमन राइट्स इंटेलिजेन्स इंडिया या संस्थेमार्फत "आपला महाराष्ट्र, आपल्या गौरवाचं व्यासपीठ!" महाराष्ट्र गौरव सन्मान सोहळा एम. आय. आर. टी. कॉलेज सभागृह, गंगापूर रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. चंद्रकांत एकनाथ बनकर (पोलीस उपअधीक्षक सेवानिवृत्त) मा. श्री. अशोक दुधारे सर (शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त) मा.डॉ. पी.बी.सुर्यवंशी (संचालक आय. एम. आर. टी. कॉलेज नाशिक )मा. व्यंकटेश नानासाहेब गोरे (सामाजिक कार्यकर्ते) डॉ. इशिका सूर्यवंशी (सिने अभिनेत्री) यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे आयोजक मा.श्री. श्रीमंत सिताराम बागल (संस्थापक अध्यक्ष) आणि मा. श्री.अनिल विश्वास आहेर( राष्ट्रीय सल्लागार) हे कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते याप्रसंगी श्री. बापूराव आनंदराव पाटील ( ठाकरे सर) उपशिक्षक साने गुरुजी विद्यामंदिर अमळनेर,अध्यक्ष शिवरथ प्रतिष्ठान अमळनेर जि. जळगाव ,जिल्हाध्यक्ष जळगांव मराठी साहित्य मंडळ ठाणे,सचिव मराठा सेवा संघ शाखा अमळनेर यांना राज्यस्तरीय सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचे समाजातून आणि शैक्षणिक क्षेत्रातून आणि मित्र परिवाकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

No comments