adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खिर्डीत बाजार उठला आणि झाड पडले रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस 4 वाजेपासून बत्ती गुल

खिर्डीत बाजार उठला आणि झाड पडले    रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस 4 वाजेपासून बत्ती गुल  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकां...

खिर्डीत बाजार उठला आणि झाड पडले 

 रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस 4 वाजेपासून बत्ती गुल 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

हवामान खात्याने दर्शविलेल्या अंदाजानुसार रावेर तालुक्यातील अनेक गावांत अचानक वातावरणात बदल होऊन दुपारी 4वाजेच्या दरम्यान अचानक जोरदार काळाप्रमाणे वारा सुटला तर अनेक गावांत पाऊस पडण्यास सुरुवात झाली काही गावांमध्ये तुरळक तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस पडला यात मोठा 


वाघोदा,निंभोरा,खिर्डी,तांदलवाडी विवरे, रावेर, रसलपुर, रमजीपुर आदीसह अनेक गावांत वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांच्या केळी मकासोबत पीकांचे नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे अद्याप तरी काही समजू शकलेले नाही दुपारी कडकडीत उन्हात अचानक. बदल होऊन काळ्याभोर ढगाळ वातावरण निर्माण झाले मोठा वाघोदा गावातील  विद्युत पुरवठा 4वाजेपासून खंडीत करण्यात आला होता 5.15ते 7.20 वाजेपर्यतही पाऊस सुरू होता रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याचे कळते

खिर्डी तालुका रावेर येथे बाजाराच्या दिवशी  वारा वादळाने बाजार पट्ट्यात कडुनिंबाचे झाड पडले मात्र झाड पडण्याच्या अर्धा तास  आधीच बाजार उठल्यामुळे अनर्थ टळला

No comments