दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या अमानवीय भ्याड हल्ल्याचा " भाजप अल्पसंख्यांक आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध....
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या अमानवीय भ्याड हल्ल्याचा " भाजप अल्पसंख्यांक आघाडी रावेर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध.
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जम्मू आणि काश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्य आणि शांततेसाठी सुप्रसिद्ध असलेल्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्यामुळे आतापर्यंत सस्तावीस पर्यटकांचा त्यात जीव गेलेला आहे, व अनेक पर्यटक गंभीर जखमी झालेले आहेत. सदरच्या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक परिवारांवर शोक कळा पसरली आहे. त्यामुळे सदरच्या दुर्दैवी घटनेचा " भाजप अल्पसंख्यांक आघाडी रावेर तालुकाच्या" वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे तसेच सदरच्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या, आणि गंभीर जखमी झालेल्या पीडित पर्यटकांच्या शोकाकुल परिवारांच्या प्रती सहवेदना व्यक्त करून दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, त्यामुळे आपल्या भारत देशात दहशतवादाला स्थान नाही. "शांतता, समता, आणि एकता याचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांसोबत आम्ही या क्षणी आहोत. सदरच्या घटनेतील दहशतवाद्यांचा तपासी यंत्रणेने लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना कठोरात कठोर असा दंड द्यावा, तरच पिडीतांच्या प्रति खऱ्या अर्थाने न्याय झाला असे म्हणता येईल, असे देखील आम्ही देशातील तपासी यंत्रणेला सविनयपूर्वक आवहान करीत आहोत. तसेच देशातील नागरिकांनी आपल्यात आपसात फूट पडू देऊ नये. शांतता समता एकता आणि सहवास कायम राखावा, व आपली देशवासियांची एकजूट कायम राखावी, असे देखील आम्ही तमाम नागरिकांना सविनयपूर्वक विनंती करीत आहोत. असे निवेदनात भ्याड हल्ल्याचा निषेध करत सांगितले आहे या प्रसंगी भाजप अल्पसंख्यांक आघाडी रावेर तालुका अध्यक्ष जाबीर बेग,उपाध्यक्ष शेख मुख्तार अहमद, सरचिटणीस रशीद बेग, जावेद बेग, अय्युब खान,शेख अस्लम आदीसह उपस्थित होते.

No comments