adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुरक्षा रक्षक भरतीला उत्तम प्रतिसाद 5 दिवस भर्ती प्रक्रिया सुरू

  सुरक्षा रक्षक भरतीला उत्तम प्रतिसाद 5 दिवस भर्ती प्रक्रिया सुरू  किरण चव्हाण अमळनेर संपादक हेमकांत गायकवाड   अमळनेर: येथील धनदाई कला व विज...

 सुरक्षा रक्षक भरतीला उत्तम प्रतिसाद 5 दिवस भर्ती प्रक्रिया सुरू 


किरण चव्हाण अमळनेर

संपादक हेमकांत गायकवाड 

 अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस आणि महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुरक्षा रक्षक भरती शिबिरास पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद लाभला. उंची, वजन व लेखी परीक्षा या माध्यमातून निवड झालेल्या युवकांना जागेवर नियुक्ती पत्र देण्यात आले. या प्रसंगी धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी. पाटील, उपाध्यक्ष प्रा. के.डी. पाटील, कोषाध्यक्ष शैलेंद्र पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, एस.एस.सिक्युरिटी डिपार्टमेंट चे वरिष्ठ भरती अधिकारी श्री. गोरख जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 

   सूक्ष्म लघु मंत्रालय  भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे आयएसओ मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस यांच्या वतीने ५ दिवस सुरक्षा रक्षक , सुपरवाइझर भरतीचे आयोजन  करण्यात आले आहे. आज या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील यांनी प्रास्ताविक केले तर गोरख जगताप यांनी भरतीची पूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. उद्घाटक बापूसाहेब के. डी. पाटील यांनी भारतमातेच्या प्रतिमेस अभिवादन व पुष्पहार अर्पण करून उद्घाटन केले. अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील यांनी रोजगार निर्मितीच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. डॉ. शैलेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. महादेव तोंडे यांनी आभार मानले. 

        या भरतीस बेरोजगार युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, ज्या तरूणांनी सहभाग घेतला त्यांना प्रशिक्षण आणि 60 वर्षा पर्यन्त कायम स्वरुपी नोकरीसाठी नियुक्तीपत्र देण्यात आले, ज्या युवकांची नोकरीसाठी निवड झाली त्यांना  एस.एस.सिक्युरिटी डिपार्टमेंटचे वरिष्ठ भरती अधिकारी श्री. गोरख जगताप व के. डी. पाटील यांच्या हस्ते जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आले .भरती झालेल्या युवकांना नोकरीसोबतच सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी व नियमानुसार भत्ते दिले जातील. तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे पेमेंट मिळणार आहे  जे 15 हजार ते 23 हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्ये मध्ये नौकरी दिली जाणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. 

      ही भरती प्रक्रिया दि. ९ मे  २०२५ ते १३ मे २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय  अंमळनेर जि. जळगाव येथे  सुरू राहणार आहे. तरी 13 मे पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी  लाभ घ्यावा असे आवाहन  अध्यक्ष डी. डी. पाटील व एसएस सिक्युरिटीजचे महेश सरतापे यांनी केले आहे.

No comments