adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमळनेरला यात्रोत्सवात मंगळवारी प्लास्टिक मुक्त अभियानाची होणार सुरुवात

  अमळनेरला यात्रोत्सवात मंगळवारी प्लास्टिक मुक्त अभियानाची होणार सुरुवात  किरण चव्हाण अमळनेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमळनेर -  येथील श्...

 अमळनेरला यात्रोत्सवात मंगळवारी प्लास्टिक मुक्त अभियानाची होणार सुरुवात 


किरण चव्हाण अमळनेर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अमळनेर -  येथील श्री संतसद्गुरु सखाराम महाराज यात्रोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षा द्वारे मंगळवारी (ता. 13) सकाळी 6 वाजता बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमासाठी विद्यापीठाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे,राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा येथील प्राचार्य डॉ व्ही आर पाटील, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए बी जैन, सचिव प्रा. डॉ.पराग पाटील,धनदाई कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.लीलाधर पाटील, पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य पी एस पाटील, मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंतराव देसले, सिनेट सदस्य डॉ.धीरज वैष्णव, डॉ.संदीप नेरकर,डॉ. संजय शिंगाणे विभागीय समन्वयक डॉ.दिलीप गिऱ्हे, मराठा महिला मंडळ अध्यक्ष प्रा. शीला पाटील,किसान कला वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. काकासाहेब गायकवाड, प्रा.डॉ.हेमंत पवार, प्रा डॉ.महादेव तोंडे, प्रा.डॉ.सतीश पारधी, प्रा.डॉ.वाघमारे तसेच विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, योगा ग्रुप अमळनेर च्या महिला भगिनी, बोरीपात्र स्वच्छ करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. तरी निसर्गप्रेमींना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात सहभागी होऊन बोरी नदी पात्र स्वच्छ करून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करूया असे आवाहन या उपक्रमाचे समन्वयक आणि विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सल्लागार समितीचे सदस्य व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.मनीष करंजे यांनी केले आहे.

No comments