प्रकाश विद्यालयाचा एचएससीचा निकाल 98.29% विज्ञान शाखा 100% तर कला शाखा 94.28% मोठा वाघोदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी (संपादक -:- हेमका...
प्रकाश विद्यालयाचा एचएससीचा निकाल 98.29%
विज्ञान शाखा 100% तर कला शाखा 94.28%
मोठा वाघोदा प्रतिनिधी मोहसीन मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा तालुका रावेर येथील प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे, ता. रावेर चा इयत्ता १२ वीचा विज्ञान शाखेचा निकाल १००% तर कला शाखेचा निकाल ९४.२८ असा एकूण निकाल ९८.२९% लागला असून विज्ञान शाखेत सार्थक अतुल पाटील हा विद्यार्थी ८८.५०% मिळवून प्रथम आला, तर सानिका किशोर चौधरी ही विद्यार्थीनी ८७.६७% मिळवून द्वितीय तर तृतीय ८७.१७% मिळवून तनिष्का संदिप पाटील ही विद्यार्थीनी आली. तर कला शाखेत नाजिया हुसेन तडवी ही विद्यार्थीनी ८१.१७% मिळवून प्रथम आली, तर तेजल समाधान ठाकरे ही विद्यार्थीनी ८०.६७% मिळवून द्वितीय तर तृतीय ८०.१७% मिळवून कोमल गोविंदा सोनवणे ही विद्यार्थीनी आली. तसेच विज्ञान शाखेत मागासवर्गीयातून विनल कैलास वाघ ही विद्यार्थीनी ८३.८३% तर कला शाखेतून नाजिया हुसेन तडवी ही विद्यार्थीनी ८१.१७मिळवून प्रथम आली. सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक श्री आर. पी. बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री पी. टी. महाजन सर, उपाध्यक्ष श्री श्रावण सिताराम महाजन, चेअरमन श्री डी. के. महाजन, व्हा. चेअरमन श्री विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री. पी. एल. महाजन व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments