adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चक्क..आमदार अमोल खताळ यांनी पकडला मध्यरात्री वाळूचा डंपर

  चक्क..आमदार अमोल खताळ यांनी पकडला मध्यरात्री वाळूचा डंपर  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   अहिल्यानगर (दि५):-अहिल्यानग...

 चक्क..आमदार अमोल खताळ यांनी पकडला मध्यरात्री वाळूचा डंपर 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 अहिल्यानगर (दि५):-अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावर संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी स्वतःरविवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ३ ब्रास वाळू भरलेला डंपर पकडून पोलिसांच्या हवाली केला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी दोघा वाळू तस्करांसह एका डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.आमदार अमोल खताळ हे रायतेवाडी येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना तनपुरवाडी रस्त्यावरून वाळूने भरलेला डंपर येताना दिसला.त्याच क्षणी आमदार खताळ यांनी आपले वाहन थांबवत खाली उतरले आणि त्या डंपर चालकाकडे विचारपूस करत चांगलेच धारेवर धरले.  त्यानंतर आमदार खताळ यांनी ही माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना भ्रमणध्वनी वरून दिली आणि पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या आदेश दिले. त्यानुसार महसूल व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने वाळूने भरलेला १० लाख रुपये किमतीचा डंपर आणि १५ हजार रुपये किमतीची ३ ब्रास वाळू असा एकूण १० लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

No comments