adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा; धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ. व्ही डी पाटील

  घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा; धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ. व्...

 घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष करा; धरणगाव ता.काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

योजनांतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये; डॉ. व्ही डी पाटील 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव : सरकारच्या घरकुल योजनांतर्गत कोणीही गरजू लाभार्थी घरापासून वंचित राहू नये व घरकुल सर्वेक्षण निष्पक्ष जबाबदारीने पार पाडावे यासाठी धरणगाव तालुका काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे नेते डॉ. व्ही डी पाटील यांनी तालुका गटविकास अधिकारी श्री. पवार, व सहा.गटविकास अधिकारी श्री.वानखेडे यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, घरकुल सर्वेक्षण हे योजनेचा मुख्य उद्देश सफल करण्यासाठी मदत करते, ज्यामुळे उपेक्षित घटकांना घर बांधता येते, आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल होतो. धरणगाव तालुक्यातील अनेक गरीब व उपेक्षित घटक आहेत. विशेषतः भिल्ल समूह घरकुलांपासून आजही वंचित व दुर्लक्षित आहेत, यांसह बेघर असलेल्या सर्वच परिवाराचे सर्वेक्षण होऊन घरकुल यादीमधे नावे समाविष्ट करण्यात यावी, व खऱ्या गरजूंना घरकुल मिळावे, अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदन सादर प्रसंगी तालुक्यात असंख्य भिल्ल कुटुंब तोकड्या जागेत मोडक्या झोपड्यात आणि उघड्यावर रहिवास करत असून, प्रशासानासाठी खूपच लाजिरवाणी बाब असल्याचे डॉ. पाटील यांनी गटविकास अधिकारी, व सहा.गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली. योग्य घरकुल सर्वेक्षण केल्यानेच पात्र लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे सर्वेक्षण काळजीपूर्वक आणि अचूक असणे आवश्यक आहे, ज्यामुळे कोणताही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असेही निवेदनात नमूद केले आहे.

No comments