यशोदाई फाउंडेशन, यावलच्या वृद्धाश्रमाचे उदघाट्न... (यावल तालुक्यासह शहरात पहिला उपक्रम) भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
यशोदाई फाउंडेशन, यावलच्या वृद्धाश्रमाचे उदघाट्न...
(यावल तालुक्यासह शहरात पहिला उपक्रम)
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथे नुकतेच यशोदाई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वृद्धाश्रम सेवा केंद्र उदघाट्न करण्यात आले.
यशोदाई फाउंडेशन, यावल ही एक सामाजिक, स्वयंसेवी संस्था धर्मदाय आयुक्त यांकडे अधिकृत नोंदणी झालेली असून समाजातील सर्वसाधारण कुटुंबातील युवक एकत्रित येऊन समाजपयोगी कार्य करीत असते. या यशोदाई फाउंडेशन चे कार्यकर्ते यांनी सामाजिक गरज लक्षात घेऊन यावल येथे दिनांक 26 मे 25 सोमवार रोजी वृद्धाश्रमाची सुरुवात केली. सदर वृद्धाश्रमाच्या इमारतीचे उदघाट्न जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक व भालोद येथील प्रगतिशील शेतकरी गणेशदादा नेहते यांनी फीत कापून केले. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून यावल भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपालसिंग पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिप माजी शिक्षण, आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, यावल कृ. ऊ. बा. स. संचालक विलास पाटील, यावल येथील प्रगतीशील शेतकरी प्रमोद नेमाडे, भाजपा वैद्यकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, साकळीकर,यावल भाजपा माजी शहराध्यक्ष डॉ निलेश गडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र काठोके, नितीन सोनार, भुषण राजेंद्र पाटील, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष संदीपभैय्या सोनवणे, आमदार अमोलदादा जावळे यांचे जनसंपर्क प्रमुख संदीप पाटील, योगेश साळुंखे पत्रकार प्रतिनिधी अरुण पाटील, यावल समाचार वाणी, यशोदाई फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज बारी, उपाध्यक्ष नरेंद्र सूर्यभान पाटील, राहुल कोळी, विजय सावकारे, अनिता बाविस्कर, गणेश कायस्थ उपस्थित होते.
नितीन सोनार यांनी मनोगत व्यक्त करतांना यशोदाई फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले डॉ. निलेश गडे, रविंद्र सूर्यभान पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण करतांना वृद्धाश्रम ही अशिक्षित समाजापेक्षा सुशिक्षित समाजाची गरज जास्त असल्याचे मत गोपालसिंग पाटील यांनी व्यक्त केले. सूत्रसंचलन, आभारप्रदर्शन डॉ. सुनिल पाटील यांनी व्यक्त केले. वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींची वैद्यकीय विनामूल्य उपचारांसाठी मी केव्हाही 24 तास सेवेत हजर राहील व संपर्कासाठी संस्थेचे अध्यक्ष पंकज अमृत बारी 9657435607 , सचिव विजय पंडित सावकारे 9595910389, व राहुल धनराज कोळी 9172949672 याच्याशी करावा व वय वृद्धांना याचा चांगला फायदा होऊ शकतो असे सूत्रसंचालन करते वेळी केले.
No comments