adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रुग्णमित्र साथी सुभाषराव गायकवाड यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची सदिच्छा भेट !

  रुग्णमित्र साथी सुभाषराव गायकवाड यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची सदिच्छा भेट !    मुंबई / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नागेबाबा...

 रुग्णमित्र साथी सुभाषराव गायकवाड यांनी घेतली रामेश्वर नाईक यांची सदिच्छा भेट ! 


 मुंबई / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नागेबाबा मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे आरोग्य मित्र श्री.सुभाषराव गायकवाड यांनी मुंबईतील मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मा.श्री.रामेश्वर (भाऊ) नाईक यांची सदिच्छा भेट घेऊन "संस्था भेट चर्चा थेट" या पुस्तकाची प्रत त्यांना भेट म्हणून दिली.

तथा रुग्णांना येत असलेल्या विविध आडचणींबाबत सविस्तर चर्चा केली.

        आरोग्य संबंधी शासनाच्या अनेक जीवनदायी अशा उपयुक्त योजना आहेत रुग्णांना उपचार कामी या खुपच महत्वाच्या ठरतात परंतु या योजनेंची जनसामान्यांना  माहिती नसल्याने त्यांना उपयोग घेता येत नाही, मात्र श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगांव अशा छोट्याशा गावात राहणारे आणी रुग्णांच्या मदतीला देवदुताप्रमाणे धावून येणारे नागेबाबा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेचे आरोग्य मित्र साथी सुभाषराव गायकवाड हे सगळ्यांपेक्षा वेगळं असं अनोखं व्यक्तीमत्व होय !

त्यांनी आजवर अनेको रुग्णांना शासकीय तथा दानशूर आणी सहकारी संस्था द्वारे मोठी मदत मिळवून दिली आहे, ज्याद्वारे कित्येक रुग्णांना पुनर्जीवन प्राप्त झाले आहे. करीता आरोग्य मित्र श्री सुभाषराव गायकवाड यांना रुग्ण मित्र या नावाने देखील संबोधले जाते.सुभाषराव गायकवाड हे गेली कित्येक वर्षे गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत - मार्गदर्शनातून रूग्ण सेवा देत आहेत. मुंबईतील रुग्ण मित्रांच्या साथीने "संस्था भेट चर्चा थेट" पुस्तकाचे प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना.ॲड.राहुल नार्वेकर यांच्या हस्ते नुकतेच मागे मुंबईतील विधानभवन या ठिकाणी करण्यात आले होते. त्याच "संस्था भेट चर्चा थेट" या पुस्तकाची प्रत मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख श्री.रामेश्र्वर (भाऊ) नाईक यांना भेटी प्रसंगी देण्यात आले. यासोबतच गरजू रुग्णांना येणा-या विविध अडचणीं बाबतची माहितीही देण्यात आली.यावर लवकरच रुग्ण मित्रांची एक बैठक आयोजित करुन, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील असे त्यांनी यावेळी आश्वासीत केले. तसेच रुग्ण मित्र साथी विनोद साडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात *वाद नको संवाद पाहीजे, समन्वयातून आरोग्य सेवेचा लाभ पाहिजे* ह्या ब्रीद वाक्याप्रमाणे रुग्ण सेवेचे काम होत राहणार असल्याचे आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड यांनी सांगितले.

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मिडिया सर्व्हिसेस

 श्रीरामपूर - 9561174111

No comments