adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरातील जलवाहीनी फुटल्याने लाखो लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्यावर नगर परिषदने तात्काळ लक्ष द्यावे मागणी

  यावल शहरातील जलवाहीनी फुटल्याने लाखो लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्यावर नगर परिषदने तात्काळ लक्ष द्यावे मागणी   भरत कोळी यावल ता.प्रतिनिध...

 यावल शहरातील जलवाहीनी फुटल्याने लाखो लिटर स्वच्छ पिण्याचे पाणी रस्त्यावर नगर परिषदने तात्काळ लक्ष द्यावे मागणी 



 भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल येथील यावल नगर परिषद व्यापारी संकुलनाच्या मागील बाजुस असलेली शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने रोज लाखो पिण्याचे स्वच्छ पाणी वाहून जात असुन,प्रशासनाने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवून सदरची फुटलेली जलवाहिनी गळती तात्काळ दुरूस्त करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हा उपसंघंटक नितिन सोनार यांनी केली आहे .         याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी म्हटले आहे की मागील दोन दिवसापासुन यावल शहरातील प्रमुख मुख्य रस्त्या वरील बाजारपेठेत असलेल्या नगर परिषद च्या व्यापारी संकुलनाच्या मागील बाजुस असलेली पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने संपूर्ण परिसर हे चिखलमय झाले असुन या ठीकाणचे व्यापारी व व्यवसायीकांना चिखला मुळे त्रास सहन करावे लागत असुन,नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या ठीकाणी फुटलेली जलवाहिनीची गळती दुरुस्त करावी व शहरात विविध ठिकाणी वारंवार होत असलेल्या जलवाहीनी गळतीकडे मुख्यधिकारी यांनी विशेष लक्ष देणे गरजे आहे,अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केली आहे .

No comments