adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संदीप सिंग गिल:- प्राध्यापक ते खडतर प्रवासांंतून आयपीएस अधिकारी बनले..‌!!

  संदीप सिंग गिल:- प्राध्यापक ते खडतर प्रवासांंतून आयपीएस अधिकारी बनले..‌!!   संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.  (संपादक -:- हेमकां...

 संदीप सिंग गिल:- प्राध्यापक ते खडतर प्रवासांंतून आयपीएस अधिकारी बनले..‌!!  


संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार घेतलेले संदीप सिंग गिल यांनी खडतर प्रवासातून यशाचे शिखर गाठले आहे, महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे, यशाचा प्रवास करत असताना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला चांगलीच गवसणी घातली. संदीप सिंग गिल यांची मातृभूमी पंजाब पण एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील जन्म कुटुंबाची परिस्थिती जेमतेम वडिलांचे लहानपणीच छत्र हरपलेले असल्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव लहानपणापासूनच होती शाळेत पहिल्यापासून हुशार पण दहावी झाल्यानंतर पुढे काय करायचे काहीच माहिती नव्हतं स्थानिक भाषेतील शिक्षणामुळे इंग्रजीचा फारसा गंध नव्हता, महाविद्यालयीन शिक्षण सुरू केल्यानंतर इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे कमीपणा वाटू लागला शिक्षकांचा शब्द चांगलाच मनाला लागला काही करून इंग्रजी भाषा शिकायचीच असा मनाशी चंग बांधला होता, पण पुढे अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर अखेर इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापक झाले आणि त्यांचा प्रवास हा प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी कायम आहे, संदीप सिंग गिल यांचे बालपण हे एकत्रित कुटुंबात गेले लहानपणापासूनच शेती विविध कामे करावी लागत असत, वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आईच्या मार्गदर्शनाखाली लहानाचे मोठे झाले, पण त्यांना काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही मनापासून आजही कायम आहे, संदीप सिंग गिल महाराष्ट्रांच्या पोलीस खात्यात एक धडाकेबाज आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते. सर्व समाज घटकांमध्ये थेट मिळून मिसळून राहणारा अधिकारी म्हणून त्यांचा आजही नावलौकिक चांगलाच आहे, पुणे शहरांतील कामगिरीची दखल  तसेच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित दादा पवारांनी घेतली, प्रत्येकानेच जर आपल्या मनाशी जिद्द बाळगली तर  यशाला गवसणी नक्कीच घालता येते हे नेहमीच लक्षात ठेवा..!!

No comments