यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानास लाडक्या बहीणी व तरूण वर्गाचा उत्फूर्त प्रतिसाद भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपा...
यावल येथे शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानास लाडक्या बहीणी व तरूण वर्गाचा उत्फूर्त प्रतिसाद
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास जळगाव जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली असुन, शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास ठीक ठीकाणी महीला व तरुण वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे . यावल येथे पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेने चे जळगाव जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या आदेशाने यावल येथे प्रमुख मार्गा वरील नगर परिषदच्या व्यापारी संकलना समोर आज दिनांक १६ मे रोजी शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी अभियानास जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी यावल तालुका प्रमुख राजू काठोके,शहर प्रमुख पंकज बारी व महिला शहर प्रमुख एडवोकेट स्वाती पाटील, शिवसेना युवा तालुका प्रमुख अजय तायडे,उपशहर प्रमुख राजू सपकाळे, उपशहर प्रमुख चेतन सपकाळे,शहर समन्वयक एडवोकेट सिद्धार्थ लोंढे व शिवसेना कार्यकर्ते अविनाश किरण बारी, किशोर कपले,सागर सपकाळे, मनोहर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची सभासद नोंदणी अभियान सुरूवात करण्यात आली असून,यावल शहर व परिसरातील असंख्य लाडक्या बहिणींनी व पुरुष आणी तरूण वर्गाकडून या सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

No comments