adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

इंस्टाग्राम वरती केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून, वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या...!

  इंस्टाग्राम वरती केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून, वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या...!  ...

 इंस्टाग्राम वरती केलेल्या मॅसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून, वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या...! 


संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)

 इंदापूर तालुक्यांमध्ये अंथुर्णे गावात बहिणीचा फोटो इंस्टाग्राम ला टाकल्याच्या कारणावरून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारांस खून झाल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली‌ घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाणेचे प्रभारी राजकुमार डुगणे यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तरुणाचा खून करून पळून गेलेल्या आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी अवघ्या पाच तासात बेड्या ठोकल्या आहेत. आकाश मुशा चौगुले (वय 22 )असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर या प्रकरणात राजेश उर्फ तात्या सायबु पवार (वय २१) असे या आरोपींचे नाव आहे, खून झालेली व्यक्ती आणि आरोपी हे दोन्ही एकाच गावातील आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून आकाश चौगुले आणि त्याची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवाराकडे जाब विचारण्यासाठी घरी गेल्या होत्या तू माझ्या बहिणीचा फोटो इंस्टाग्राम वरती मेसेज द्वारे मला का पाठवला, हा राग मनात धरून आरोपी राजेश उर्फ तात्या सायबु पवार यांने आकाश चौगुले याचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे,  सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुगणे पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर पोलीस हवालदार गुलाबराव पाटील शैलेश स्वामी दत्तात्रय चांदणे जगदीश चौधर विकास निर्मळ पोलिस अंमलदार अभिजीत कळस्कर विक्रमसिंह जाधव आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या तपासात सहभाग घेतला

No comments