Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेच्या अर्धनग्न आंदोलनाला यश.

 जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेच्या अर्धनग्न आंदोलनाला यश. राज्यातील 29 महानगरपालिका व 387 नगरपरिषदांना कामगार...

 जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेच्या अर्धनग्न आंदोलनाला यश.


राज्यातील 29 महानगरपालिका व 387 नगरपरिषदांना कामगार उपायुक्त यांचे कार्यवाही चे  आदेश.


मुंबई वृत्तान्त

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 29 मे 2025 रोजी कामगार कार्यालय बांद्रा मुंबई येथे अर्धनग्न आंदोलन करण्याचे पत्र कामगार आयुक्त तसेच पोलीस प्रशासनाला जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेच्या वतीने संयुक्तपणे देण्यात आले होते.परंतु मनाई आदेशानुसार माननीय कामगार उपायुक्त व पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्ते जेष्ठ नागरिक तथा जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे व भीमशक्ती शिवशक्ती संघटनेचे शिवाजीराव म्हस्के यांचे सोबत कार्यालयात चर्चा करीत ठोस कार्यवाही चे पत्र माननीय कामगार उपायुक्त सं.न.कानडे यांनी आश्वासित केले.तसे पत्र संघटनेच्या पदाधिकारी यांना तसेच पुढील कार्यवाही आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहे. 


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 1 जानेवारी 2011 पासून आजपर्यंत किमान वेतन कायद्यानुसार पगार न देणे, ई - सीक न भरणे,तटपूंजा पगार देणे,अधिकारी व ठेकेदार यांच्या अभद्र युतीने कामगारांचे शोषण करत हजारो कोटीचा भ्रष्टाचार, घोटाळा केल्या प्रकरण आदींबाबत माननीय कामगार आयुक्त यानी निरीक्षण नोंदवित गंभीर निरीक्षण नोंदवले आहे. 

महानगरपालिका मुख्य नियुक्त आयुक्त,लेखापाल व संबंधित अधिकारी,कर्मचारी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कामगार कायद्याची अंमलबजावणी न करणे, 

कंत्राटी कामगार पुरवठा ठेकेदार,यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत शासकीय रक्कम वसूलीची तक्रार जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन या सामाजिक संघटनेने दिले आहे. 

 राज्यातील 29 महानगरपालिका व 387 नगरपरिषदेने कंत्राटी सफाई कामगारांचा शोषणा प्रश्नी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांसाठी कामगार कायदा अंमलबजावणी करावी यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने माननीय कामगार उपायुक्त यांनी संबंधित विभागीय कार्यालये यांना पत्रे देत तात्काळ कार्यवाही निर्देश देत आंदोलनकर्त्यांना माहिती देत तसेच विविध विषयांवर चर्चा करत आंदोलन स्थगित करण्यात आले होते. 

कामगार कार्यालयात अर्धनग्न आंदोलनात जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे,भीमशक्ती शिवशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव म्हस्के,जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल ठोंबरे,जनहितार्थ जन आक्रोश सोशल असोसिएशन चे खान्देश अध्यक्ष- पंकज आहिरे,शिवशक्ती भीमशक्ती संघटनेचे उल्हासनगर शहराध्यक्ष श्री साठे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No comments