डिंगम्बर महाराज चिनावल कर आषाढी पायी दिंडीचे खानापूर येथून ६ जूनला प्रस्थान ; संस्था अध्यक्ष नरेंद्र नारखेडे इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:...
डिंगम्बर महाराज चिनावल कर आषाढी पायी दिंडीचे खानापूर येथून ६ जूनला प्रस्थान ; संस्था अध्यक्ष नरेंद्र नारखेडे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर यावल व रावेर तालुक्यातील वै डिंगम्बर महाराज चिनावल कर आषाढी पायी दिंडीचे दि 6 जून रोजी खानापूर येथून प्रस्थान होईल अशी माहिती अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली
यासंदर्भात नुकतीच फैजपूर येथे दिंडी समिती व मठ संस्था विषवस्थ मंडळाची सभा संस्था अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांचे अध्यक्षतेखाली व दिंडी परंपरा अधिपती दुर्गादास महाराज नेहते यांचे उपस्थिती मध्ये पार पडली दिंडीत येणारे वारकरी यांचे सुविधा बाबत चर्चा होऊन आवश्यक वाहने सोबत असतील व मुक्कामाची व्यवस्था डिंगम्बर महाराज मठात राहील दिंडी खानापूर हुन चिनावल येथे डिंगम्बर महाराज समाधी स्थळ येथे येऊन अभिषेक ।भजन होऊन पुढे रोझोदा खिरोडा कलमोडा बोरखेडा हंबर्डी मार्गे भुसावळ खडका जामनेर सिल्लोड भोकरदन जालना बीड बार्शी मार्गे २३ दिवसात ५०० की मी प्रवास करून पंढरपूर पोहचेल या दिंडी परंपरेची स्थापना वै डिंगम्बर महाराज चिनावल कर यांनी केलेली असून पुढे विठ्ठल महाराज हंबर्डीकर यांनी नेतृत्व केले पुढे वै अरुण महाराज बोरखेडे कर यांनी दिंडीचे पुनर्स्थापना करून कार्य व्यापक केले त्यांना अखंड वारकरी विणेकरी भगवन्त महाराज चौधरी खानापूरकर यांनी अनमोल सहकार्य करून दिंडी विस्तार केला या सभेस उपाध्यक्ष घनश्याम भंगाळे सचिव विठ्ठल भंगाळे खजिनदार किशोर बोरोले विषवस्थ जयराम पाटील शरद महाजन धनंजय चौधरी विजय महाजन रमेश महाजन
टेनू दास फेगडे भास्कर बॉंडे अतुल तळे ले ललिता महाजन आशाबाई तळले यासह समिती सदस्य उपस्थित होते दिंडीत सहभागी होणारे वारकऱ्यांनी ५ जून रोजी संध्याकाळी खानापूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते व विणेकरी भगवन्त महाराज चौधरी यांनी केले आहे सभा कार्यक्रम पार पडणेसाठी अनिल नारखेडे सुनील नारखेडे एन पी चौधरी राजेंद्र मानेकर राजू मिस्त्री शेखर चौधरी भूषण नारखेडे युवराज चोपडे किरण चौधरीयांनी परिश्रम घेतले.
No comments