Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलीसांची कत्तलीसाठी जाणाऱ्या नऊ बैलांची सुटका करण्यात यश आले

  रावेर पोलीसांची कत्तलीसाठी जाणाऱ्या नऊ बैलांची सुटका करण्यात यश आले रावेर प्रतिनिधी (आदित्य  गजरे) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक 30/...

 रावेर पोलीसांची कत्तलीसाठी जाणाऱ्या नऊ बैलांची सुटका करण्यात यश आले

रावेर प्रतिनिधी (आदित्य  गजरे)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दिनांक 30/05/2025 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विशाल जयस्वाल यांनी कळविले कि, राकेश सुखलाल राजगोन्डा रा पाल ता रावेर जि जळगांव हा अवैद्यरित्या गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने लालमाती, खिरोदा, रसलपुर या गुप्त मार्गाने गोवंश जातीचे जनावरे पायी हाकलत घेवुन येत आहे असे गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पोहेकॉ सिकंदर तडवी, पोकॉ सचिन घुगे, पोकों/प्रमोद पाटील, पोकों/ महेश मोगरे, पोकॉ योगेश पाटील यांनी कबरस्थान जवळ समोरुन एक इसम गोवंश जातीचे जनावरे एकमेकांना दोराने घट्ट बांधुन पायी चालत हाकलत घेवुन येतांना दिसला म्हणून आमची खात्री झाल्याने आम्ही सकाळी 05.00 वा जनावरे थांबवीण्याचा प्रयत्न करीत असतांना जनावरांसोबत असलेला इसम याला पोलीस असल्याचे समजल्याने तो आम्हा पोलीसांना प्रयत्न करीत असतांना जनावरांसोबत असलेला इसम याला पोलीस असल्याचे समजल्याने तो आम्हा पोलीसांना पाहुन जागा मिळेल त्या दिशेने अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. सदर गोवंश जातीच्या जनावरांची पाहणी केली असता त्यांच्या अंगावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमला दिसल्याने सदर जनावरे हि कत्तलीच्या उद्देशाने एकमेकांना दोराने बांधुन पायी हाकलत नेत आहे म्हणुन गोवंश जातीचे 09 जनावरे ताब्यात घेवुन गोवर्धन गौशाळा रावेर येथे सुरक्षीत ठेवण्यात आले व पोकों सचिन रघुनाथ घुगे यांच्या फिर्याद वरुन प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 प्राण्यांना क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध करण्या बाबत अधि कलम ।। चे (c), (d), (e). (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पोहेकॉ सिकंदर रमजान तडवी हे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक डॉ.श्री. महेश्वर रेड्डी सो, मा.श्री अशोख नखाते साहेब, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ श्री. कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. श्री विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों/सिकंदर तडवी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, योगेश पाटील यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे

No comments