सांगवी ते बोरखेडा पुलासह व रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे ? चौकशीची वाहन धारकांची मागणी तर नाराजीचे हि सुर शब्बीर खान यावल ...
सांगवी ते बोरखेडा पुलासह व रस्त्याचे डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे ?
चौकशीची वाहन धारकांची मागणी तर नाराजीचे हि सुर
शब्बीर खान यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल -:- सांगवी ते बोरखेड़ा रस्त्यांचे व पुलाचे काम सध्या सुरू असून ते काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याची तक्रार वाहनधारक करतांना दिसत आहेत. सदर कामात रस्त्याचे बाजुची साईट पट्टी ही तेथील जमिनीची माती उकरुन भर करतांना दिसून येत आहे नवीन मुरूम आणलेली नाही तर विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची मरूम चा वापर होत नाही आहे तर तसेच काम अर्धवट सोडून ठेकेदार आर्थिक साध्य करणार कि काय अशी परिस्थिती दिसत आहे . अंदाजपत्रकामधे दोन पुलांचे बांधकाम दिलेले आहे पण दोन्ही ठिकाणी पुलाचे टुकडे बांधलेले दिसुन येत आहे . यामुळे या सांगवी ते बोरखेडा पुलाचे व डांबरीकरण रस्त्यांचे काम अंदाजपत्रका नुसार होत नसुन पूर्ण पणे बोगस रित्या होत आहे यामुळे रावेर /यावल विधानसभेचे आमदार अमोल दादा जावळे यांनी स्वतःहा लक्ष देऊन होणाऱ्या रस्त्यांचे काम थांबवावे व वरिष्ठ पातळीवर तक्रार करुण सखोल चौकशी करावी अशी मागणी परिसरातून होत आहे

No comments