अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेम...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२२):-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.गृह विभागाकडून गुरुवारी राज्यातील २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.गृह विभागानं अहिल्यानगरसह रायगड,लातूर, धाराशिव,ठाणे शहर,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर,नाशिक ग्रामीण, बुलढाणा,सातारा,अकोले, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.त्याच बरोबर लोहमार्ग पोलीस,राज्यातील मोठ्या शहरातील उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

No comments