गिरडगाव - वाघोदा रस्त्यावर वादळात निंबाची फांदी कोसळली, सुदैवाने दुर्घटना टळली भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) या...
गिरडगाव - वाघोदा रस्त्यावर वादळात निंबाची फांदी कोसळली, सुदैवाने दुर्घटना टळली
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातून मार्गस्थ होणारे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर यावल ते चोपडा रस्त्यावर गिरडगाव या गावाजवळ सोमवारी सायंकाळी वादळात निंबाच्या भल्या मोठ्या झाडावरील एक फांदी कोसळून रस्त्यावर पडली. रहदारीच्या या मार्गावर अचानक ही फांदी पडली तेव्हा त्याच्या समोर एक वाहन चालत होते वाहन चालक चुंचाळे येथील प्रकाश चौधरी यांनी स्वतःच्या वाहनावर नियंत्रण मिळवत वाहन थांबवले अन्यथा दुर्घटना घडली असती. दरम्यान या राज्य मार्गावर अनेक जीर्ण झालेले जुने वृक्ष आहेत गेल्या आठवड्यातच चिंचोली या गावाजवळ असेच एक वृक्ष चालत्या वाहनावर कोसळून चार जण जखमी झाले होते तर सोमवारी पुन्हा गिरडगाव जवळ हे वृक्ष कोसळल्याने काहीजण थोडक्यात बचावले आहे. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील वृक्षांचा सर्वे करावा आणि धोकेदायक ठरणारे वृक्ष हे छाटावे अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.--

No comments