वादळात पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावा चुंचाळे ग्रामस्थांची मागणी भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी ✒️ (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल तालुक्य...
वादळात पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावा चुंचाळे ग्रामस्थांची मागणी
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी ✒️
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल तालुक्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर मुख्य रस्त्याला जोडलेला रस्ता म्हणजे चुंचाळे फाटा ते गांव रस्त्यावर दि.६ मे रोजी झालेल्या तुफानी पाऊस व वादळीवाऱ्यामुळे जनजिवन विस्कळीत झाले होते तर या मुख्य रस्त्यावर अनेक झाडें तुटून पडले होते व आहेत तर काही झाडें उपटून पडले आहेत, ही झाडे तात्काळ हलवण्याची मागणी चुंचाळे बोराळे येथील गावाकऱ्यांनी केली आहे.
आज अवघे ७ दिवस उलटून सुद्धा या रस्त्यावर पडलेल्या झाडांची सार्वजनिक बांधकाम विभाग यावल चे अधिकारी विल्हेवाट लावत नाहीत, या मुळे मोठी खंत गावकरी यांच्या वतीने व्यक्त केली जात आहे, चुंचाळे फाटा ते बोराळे,चुंचाळे, नायगाव,मालोद, आडगाव या रस्त्याने केळीने भरलेले गाडी एस. टी. बस ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे, रस्त्यावर मोटार सायकली व केळी वाहतूक करणाऱ्या ट्रक, शेतकऱ्यांचे बैल गाडे व पायी चालणाऱ्या लोकांना मोठी झळ सोसावी लागत आहे, म्हणून या रस्त्यावर पडलेल्या झाडांची लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने विल्हेवाट लावावी, हा रस्ता मोकळा करावा, या प्रकारची मागणी गावाकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.
रस्त्यावर पडलेले झाडें देत आहेत अपघातास निमंत्रण
मुख्य रस्त्यावर पडलेले अनेक झाडें,रस्तावर येणाऱ्या नवीन वाहणास अंदाज जर नाही आला तर मोठा अपघात होवू शकतो, कोणाला तरी या मुळे जीव जाऊ शकतो त्यामुळे ह्या रस्तावर पडलेले झाडें अपघातास कारणीभूत ठरु शकता
होणाऱ्या अपघाताची सर्वनिक बांधकाम विभाग जबाबदारी घेईल का?
६ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे चुंचाळे, बोराळे सह परिसरात अनेक ठिकाणी झाडें उपटून पडले आहेत, या संदर्भात पत्रकार सुपडू संदानशिव व प्रकाश चौधरी यांनी ८ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे हर्षल कवीश्वर शाखा अभियंता व विकास जंजाळे वरिष्ठ लिपिक यांना फोन करून माहिती दिली होती मात्र या प्रकरणाची दखल घेण्यास टाळाटाळ झाली असून एखादया व्यक्तीचा जीव जाईल तेव्हा संबंधित विभाग ठिकाणावर येईल का? तरी या गंभीर विषयाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकर घ्यावी अशी मागणी, चुंचाळे बोराळे सह परिसरातील नागरीकांच्या वतीने होत आहे.

No comments