adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न, चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न, चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद   भरत कोळी यावल ता‌.प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरातील प्रमु...

सराफा दुकान फोडण्याचा प्रयत्न, चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  

भरत कोळी यावल ता‌.प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शहरातील प्रमुख मार्गावरील मेन रोडावर चावडीच्या पुढे असलेल्या लक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या -चांदी च्या दुकानाचे चार अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेपूर्वी शटरचे कुलूप तोडले मात्र आत चैनल गेट असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.दरम्यान याच दुकानचे  काही अंतरावर असलेल्या एका बंद घराचे कुलूप देखील त्यांनी तोडले मात्र तेथेही काही हातात मिळाले नाही.  यापूर्वी याच मेन रोडवर एका दवाखान्यात अशाच पद्धतीने चोरी करण्यात आली होती व आता या सराफा व्यावसायिका च्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.             चोरीच्या प्रयत्नाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

यावल शहरात मेन रोडवर चावडीच्या पुढे लक्ष्मी ज्वेलर्स नामक नितीन दिनकर रणधीरे यांचे हे दुकान आहे. या दुकानाचे शटर चे कुलूप रविवारी पहाटेपूर्वी चार वाजेच्या सुमारास एका दुचाकी वर आलेल्या चार अज्ञात चोरट्याने तोडले.आत चैनल गेट असल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीचा क्रमांक एम. एच. १९  डी. एल. ९७५७ असा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आली असून  चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. येथे चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा या भागातील कांचन श्रीराम सराफ यांच्या घराकडे वळवला त्यांच्या घराला कुलूप होते. कुलूप तोडून त्यांनी आत प्रवेश केला मात्र घरामध्ये चोरी करणे योग्य काहीच नव्हते म्हणून ते तिथून पसार झाले. ही घटना रविवारी उघडकीस आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, उपनिरीक्षक सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार निलेश चौधरी यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार निलेश चौधरी करीत आहे.

No comments