adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा पोलीसांनी कत्तलीच्या उददेशाने बांधुन ठेवलेल्या दोन गाईची केली सुटका

  सावदा पोलीसांनी कत्तलीच्या उददेशाने बांधुन ठेवलेल्या दोन गाईची केली सुटका  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   साव...

  सावदा पोलीसांनी कत्तलीच्या उददेशाने बांधुन ठेवलेल्या दोन गाईची केली सुटका 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सावदा शहरातील ख्वाजानगर परीसरातील निमजाय माता रोडवरील काटेरी झुडुपांमध्ये दोन गायी  कत्तल करण्याच्या उददेशाने बांधुन ठेवण्यात आल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर   सपोनि विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी तातडीने सावदा पोलीस कर्मचारी पथका सह धाव घेत सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई केली संबंधित ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या गाई हया सावदा शहरातील शेख रसुल शेख चाँद कुरेशी यांने कत्तल करण्याचे उददेशाने आणल्या असल्याची निष्पन्न झाले. या प्रकरणी घटनास्थळी  पंचनामा करुन 60,000/- रु किंमतीच्या दोन्ही गाई  ताब्यात घेण्यात आल्या असुन त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्या सुरक्षीततेकरीता बाफना गो शाळा जळगांव येथे पाठविण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे हवालदार निलेश बाविस्कर यांचे फिर्यादीवरुन सीसीटीएनएस गुन्हा क्र. १२५/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम- १९७६ (सुधारणा २०१५) चे कलम ५(अ), ५(ब), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम-१९६० चे कलम ११(१)(च) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ चे कलम ११९ अन्वये शेख रसुल शेख चाँद कुरेशी रा.ख्वाजा नगर सावदा यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत.

No comments