Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

तंबाखु मुक्त भारतासाठी घेण्यात आली शपथ

  तंबाखु मुक्त भारतासाठी घेण्यात आली शपथ   भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज यावल तालुका विधी सेवा समिती च्या वतीने...

 तंबाखु मुक्त भारतासाठी घेण्यात आली शपथ 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज यावल तालुका विधी सेवा समिती च्या वतीने यावल पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात 'तंबाखू मुक्त भारत' या थीम अंतर्गत शपथ घेण्यात आली.


दिनांक 31 मे जागतिक तंबाखू मुक्त दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे जगभरामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडत असतात. भारताच्या बाबतीत सांगायचे झाल्यास तंबाखू आणि तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन केल्याने होणाऱ्या कॅन्सर च्या आजारामुळे दररोज 3500 लोक मृत्युमुखी पडतात. प्रत्यक्ष तंबाखूच्या सेवनामुळे आणि अप्रत्यक्षरीत्या तंबाखूजन्य पदार्थांचा संपर्कामुळे किंवा धूम्रपानाचा संपर्कात आल्यामुळे कॅन्सर सारखा आजाराचा प्रसार होतो. अशा पदार्थांचा सेवनामुळे अनेक कुटुंब उध्वस्त होत असतात. याची जाणीव व्हावी या उद्देशाने यावल तालुका विधी सेवा समिती चे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश श्री आर एस जगताप यांच्या आदेशानुसार तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्री. जी आर कोलते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज यावल पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात  ही जनजागृती  करण्यात आली. तसेच उपस्थितांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा निषेध करण्याविषयी आवाहन करण्यात आले. यावेळी तंबाखू मुक्त भारत, स्वस्थ भारतासाठी शपथ देखील घेण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते शशिकांत वारूळकर हे होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यावल तालुका सेवा समितीच्या सचिव तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती यावल डॉ. मंजुश्री गायकवाड  या होत्या. या कार्यक्रमात  एच. एन. तडवी विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत ) आर. पी इंगळे शाखा अभियंता, ज्ञानेश्वर निळे सहाय्यक प्रशासन अधिकारी, चिमणकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ई. के. चौधरी कृषी विस्तार अधिकारी,  मजीत तडवी अध्यक्ष, ग्रामसेवक युनियन मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक श्री संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक अजय बडे तसेच पंचायत समिती कर्मचारी लतेश नेमाडे, राजरत्न अहिरे, युवराज कोल्हे,आशिक पिंजारी, नितीन ढाके, नितीन डोहळे तसेच इतर पंचायत समिती कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

No comments