प्रहारच्या बेमुदत अन्न त्याग आंदोलनात सहभागी व्हा... जिल्हाध्यक्षा अरूणाताई काकड यांचे आव्हान शामसुंदर सोनवणे वि.प्र. (संपादक -:- हेमकांत...
प्रहारच्या बेमुदत अन्न त्याग आंदोलनात सहभागी व्हा... जिल्हाध्यक्षा अरूणाताई काकड यांचे आव्हान
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अकोला:- प्रहार जनशक्ति पक्षाचे संस्थापक अध्यक्ष वंदनिय बच्चुभाऊ कडु यांचे प्रमुख नेतृत्वात ८ जुन २०२५ रविवारी वेऴ १२ :०० वाज़े पर्यंत,श्री क्षेत्र मोझरी,तालुका ,तिवसा जिल्हा अमरावती येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधी जवऴ बेमुदत अन्न त्याग आंदोलन आयोजित करण्यात येत आहे तरी प्रहार जनशक्ति पक्ष,प्रहार दिव्यांग क्रांति संस्था , प्रहार मुकबधीर संघटना यांचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी ,वंदनिय बच्चुभाऊ कडु हिंतचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे
आवाहन प्रहार अपंग संघटना अकोला जिल्हाध्यक्षा सौ अरूणाताई काकड, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ताथोड तसेच प्रहार अपंग संघटना अकोला सर्व पदाधिकारी यांनी आवाहन केले आहे , शेतकरी, दिव्यांग विधवा कष्टकरी मजुर यांचे करिता एकमेव पक्ष प्रहार आहे वंदनिय बच्चुभाऊ कडु यांचे प्रश्न नेहमी मांडत असतात
शेतकरी यांना कर्ज माफी , दिव्यांगांना सहा हजार रूपये मासिक मानधन , शेतकरी यांचे पिकाला हमीभाव ,शिक्षकांचे प्रश्न प्रामुख्याने निकाली लागुन अमंलबजावणी करावी,या करिता हे बेमुदत अन्न त्याग आंदोलन यशस्वी करावे या करिता सर्वानी मोठया संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती आहे.

No comments