पिंटू पावरा यांचा आदिवासी बांधवाकडून जाहीर सत्कार चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामीण प...
पिंटू पावरा यांचा आदिवासी बांधवाकडून जाहीर सत्कार
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामीण पूर्व अध्यक्ष पदी मालापूर येथील पिंटू गुलसिंग पावरा याचा निवड झाल्या बद्दल वैजापूर ता चोपडा येथे आदिवासी बांधवाकडून जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी कर्जाणे येथील उप सरपंच प्रमोद बारेला यांनी सूत्रसंचालन केले तसेच मेलाने येथील माजी सरपंच व आदिवासी जेष्ट नेते प्रताप पावरा व खाऱ्यापाडा येथील सामाजिक कार्यकर्ते वना पावरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर दत्तू पावरा सरपंच वैजापूर यांनी आभार मानले सदर कार्यक्रम हा वैजापूर येथील ईश्वर बारेला यांच्या घरी पार पडला एक आदिवासी सामान्य कार्यकर्ता आपल्या समाजामध्ये काम करता करता देशातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष झाल्याबद्दल आदिवासी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण या कार्यक्रमांमध्ये दिसून आले या या कार्यक्रमात आदिवासी समाजसेवक सरपंच व गाव पाटील या सर्वांनी सहभाग घेतला

No comments