adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चिंचोली जवळ भिषण अपघात : निंबाच्या झाडात कार घुसल्याने चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

  चिंचोली जवळ भिषण अपघात : निंबाच्या झाडात कार घुसल्याने चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...

 चिंचोली जवळ भिषण अपघात : निंबाच्या झाडात कार घुसल्याने चार जखमी, एकाची प्रकृती गंभीर 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल, ता. ३ : यावल तालुक्यातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर चिंचोलीजवळ एका मोठ्या निंबाच्या झाडात कार घुसल्याने भिषण अपघात घडला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ही घटना ३ मे रोजी रात्री अंदाजे २.३० वाजेच्या सुमारास घडली. गुजरातकडून भुसावळकडे लग्नसमारंभासाठी निघालेल्या जीजे-०५ जे ई ८०७१ या हुंडाई चारचाकी वाहनाने चिंचोली-धानोरा रस्त्याजवळ रस्त्यावर कोसळलेल्या मोठ्या निंबाच्या झाडात जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, कारमधील चार जण जखमी झालेत. कार चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या जळगाव येथे उपचार सुरू आहेत. जखमी सर्व व्यक्ती गुजरात राज्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मदत कार्य तातडीने सुरू करण्यात आले आणि सर्व जखमींना तत्काळ जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

दरम्यान, राज्य मार्गाच्या कडेला असलेली मोठी जिवंत झाडे पाडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. मात्र, या घटनेत जिवंत झाड अचानक रस्त्यावर कोसळले कसे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

No comments