आमराईच्या बागेची कहाणीच निराळी; गवतात लपवली बोगस कापूस बियाणी, याप्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ग...
आमराईच्या बागेची कहाणीच निराळी; गवतात लपवली बोगस कापूस बियाणी,
याप्रकरणी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील तावसे येथे कृषी विभागचे जिल्हा भरारी पथकाच्या कारवाईत प्रतिबंधित सुमारे बारा लक्ष बहात्तर हजार रकमेचे बनावट एच टी बी टी कापूस बियाणे जप्त करण्यात आले असून संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की
जिल्हा भरारी पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर,जिल्हाअधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के,पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा नियोजन करण्यात आले.
जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मौजे कुरवेल येथील नदी किनारी आमराई असलेल्या शेतात बनावट एच टी बी टी कापूस बियाणे लपवून गुपचूप विक्री केले जात आहे.अशा माहिती त्यानुसार उल्हास ठाकूर विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक,सदाशिव बारेला कृषी सहाय्यक,किरण गोसावी कृषी सहाय्यक,अर्चना पाटील पोलीस पाटील तावसे,किरण पाटील कृषी अधिकारी,पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन,निलेश पाटील यांच्या पथकाने तावसे येथील संशयित आरोपी जीवनलाल चौधरी यांच्या तावसे बुद्रूक हद्दीतील आंब्याच्या बागेत तपासणी केली असता एका आंब्याच्या झाडा खाली गवताने झाकून ठेवले अनाधिकृत,विनापरना,प्रतिबंधित एच टी बी टी कापसाचे योद्धा व सिल्वर आर असे छापलेले ८५० पाकिटे,एकुण किंमत रुपये १२७२००० एवढा साठा जप्त केला असून बियाणेकायदा,बियाणे नियम,अत्यावश्यक वस्तू अधिनियम,महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम,पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पुढील तपास चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.


No comments