अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ शासनाने मदत करावी तेल्हारा तहसील ला प्रहार जनशक्ती...
अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ शासनाने मदत करावी तेल्हारा तहसील ला प्रहार जनशक्ती पक्षाचे निवेदन
शामसुंदर सोनवणे वि.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा तालुक्यातील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये जोरदार पाऊस येऊन अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेलं असुन गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडला असून या पावसाने शेतकऱ्यांचे भुईमूग, केळी, ज्वारी या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे एकीकडे निसर्ग साथ देत नाही दुसरीकडे व्यापारी वर्ग शेतकऱ्याला जगू देत नाही महाराष्ट्र शासनाने जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सुद्धा दिली नाही. अशा अवस्थेत बळीराजाचा वाली कोण शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दि. 30 मे रोजी तेल्हारा तहसील वर नायब तहसीलदार राणे साहेब यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. याकरीता आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, महासचिव राजेश पाटील खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे, शेतकरी तालुका अध्यक्ष गोपाल घुगड, अशोकराव नेमाडे शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख, युवक उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे, विकी मल शहर प्रमुख प्रहार अपंग संघटना कार्याध्यक्ष संदीप ताथोड यांच्या नेतृत्वात निवेदन दिले शेतकऱ्यांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई ची मदत न दिल्यास शासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे यांनी दिले निवेदन देतेवेळी उमेश कोरडे, संतोष गिरे, प्रदीप पाथ्रीकर, शिवाजी जोध, श्याम बोर्डे, ऋषिकेश जायले, उदित सैनी, ज्ञानदेव खडसे, विष्णू खडसे, विशाल बघ्घन, रणवीर काकडे, भूषण झंवर, स्वप्निल कोरडे शिवाजी कोरडे, शुभम मोहोड, अमित इंगळे, कार्तिक इंगळे, शेख शारिक प्रशांत बाभुळकर, ऋषिकेश खारोडे, दत्ता मोडक, रोहित खोपाले, विनोद खडसे, भानुदास जोध, तालुक्यातील शेतकरी व प्रहार सेवक बहुसंख्येने उपस्थित होते
No comments