मुक्ताईनगरात अंतुर्ली ,पातोंडी, नरवेल येथील बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप मुक्ताईनगर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) मु...
मुक्ताईनगरात अंतुर्ली ,पातोंडी, नरवेल येथील बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे वाटप
मुक्ताईनगर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मुक्ताईनगर येथे योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या उपक्रमात नोंदणी केलेल्या अंतुर्ली, पातोंडी, नरवेल येथील इमारत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संचाचे (भांडी) वाटप करण्यात आले. यापूर्वी 434 लाभार्थ्यांना संच वाटप करण्यात आले. मुक्ताईनगर शहरात कामगारांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी देखील कॅम्प लावण्यात आला होता. आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक ठिकाणी नागरिकांना लाभ घेता यावा म्हणून या कॅम्पचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून ही योजना राबवण्यात येत आहे. त्यातून कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच आरोग्यासाठी पाच लाखाचा विमा मृत्युपछात आर्थिक मदत, सुरक्षा संच,गृह उपयोगी संच दिले जातात. गृहपयोगी संचासाठी नोंदणी केलेल्या अंतुर्ली, पातोंडी ,नरवेल येथील लाभार्थी यांना १२ मे रोजी सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत गृह उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सुकन्या संजना पाटील व प्रियंका पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते . जास्त गर्दी होऊ नये म्हणून दर दिवशी वेळापत्रकानुसार तालुक्यातील चार गावातील लाभार्थी यांना गृह उपयोगी साहित्य वाटप केले जाईल.प्रत्येक गावाचा दिवस ठरवून वेळापत्रकानुसार त्यांच्या ठिकाणी लावले जाईल त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यातील नागरिकांनी ज्या दिवशी ज्या गावाची वाटप असेल त्या ठिकाणी जाऊन या योजनेचा लाभ घ्यावा गृह उपयोगी संचासाठी स्वतः लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे .सोबत बांधकाम कामगार ओळखपत्र ,नोंदणी केलेली ऑनलाइन पावती व आधार कार्ड हे कागदपत्र घेऊन गृहउपयोगी संच देताना लाभार्थी यांचा ऑनलाइन फोटो काढून वितरण केले जात आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे कडून हे काम मिळाले असून मुक्ताईनगर येथील संच वाटपाचे काम सुरू आहे .नोंदणी केलेले लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ही योजना मोफत आहे.
सर्व लाभार्थ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे


No comments