adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सितारे जमीनपर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अभिनेता आमिर खान यांनी साधला नगरकरांशी संवाद जाणून घेतल्या प्रतिक्रिया

  सितारे जमीनपर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अभिनेता आमिर खान यांनी साधला नगरकरांशी संवाद जाणून घेतल्या प्रतिक्रिया   सचिन मोकळं अहिल्यानगर (स...

 सितारे जमीनपर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अभिनेता आमिर खान यांनी साधला नगरकरांशी संवाद जाणून घेतल्या प्रतिक्रिया  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.13):- दिव्यांगांबद्दल प्रेक्षकांना दृष्टी देणाऱ्या नवी दृष्टी देणाऱ्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचे प्रदर्शन दर्दी आणि अभ्यासू नगरकरांसाठी स्नेहालय परिवाराने  रविवार दि.11 मे  रोजी आयोजिले होते.येत्या 20 जून 2025 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाबाबत जाणकारांच्या प्रतिक्रिया आजमावण्यासाठी अभिनेता आमिर खान यांनी  अहिल्यानगरची निवड केली आणि स्नेहालय संस्थेवर आयोजनाची जबाबदारी दिली.ऊर्जा रंगभवन येथे आयोजित या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी  240 निमंत्रितांची उपस्थिती होती.चित्रपट प्रदर्शनानंतर स्वतःआमिर खान यांनी सुमारे एक तास उपस्थित तज्ञ,जाणकार नगरकरांशी संवाद केला.मेंदूच्या कार्यपद्धतीत वेगळेपणा असणाऱ्या ( Neurodivergent ) व्यक्तींचे भावविश्व आणि क्षमता यांची मनोरंजक अभिव्यक्ती या चित्रपटात आहे.अहिल्यानगर शहराशी स्नेहालय संस्थेमुळे जुळलेल्या भावबंधाचा उल्लेख करून आमिर खान म्हणाले की, अभ्यासू नगरकरांच्या सर्व सूचना आणि प्रतिक्रिया दिव्यांगांबद्दलची समाजातील समज विकसित  करण्यासाठी महत्वपूर्ण आहेत.

 यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यात  प्रयोगशील शाळा " ऊर्जा गुरुकुल" चालविणाऱ्या सौ. कल्याणी फिरोदिया यांना पद्मश्री पोपटराव पवार,पाणी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. अविनाश पोळ आदींच्या हस्ते गौरविण्यात आले.फिरोदिया परिवारातर्फे गौरव फिरोदिया यांनी सन्मान स्वीकारला.यावेळी झालेल्या संवादात दिव्यांगांसाठी कार्यरत महाराष्ट्रातील  सामाजिक संस्था,महसूल - पोलीस आणि न्याय व्यवस्थेतील संवेदनशील मान्यवर,समाज कल्याण आणि महिला बाल विकास क्षेत्रात कार्यरत अधिकारी,विशेष गरजयुक्त मुलांचा सांभाळ करणारे पालक, स्पेशल एज्युकेटर्स,बालकल्याण समित्यांचे पदाधिकारी, 

 आदींचा समावेश होता.यावेळी निर्माल्य संस्थेच्या संस्थापिका मीना बेदरकर,बालरोग तज्ञ डॉ. सुचित तांबोळी,दिव्यांग विकास संस्थेचे विकास घोगरे,डॉ.शंकर शेळके,उडान संस्थेच्या हर्षाली चौधरी,अनाम प्रेम संस्थेचे सौ. अनिता आणि अजित माने,डॉ. रेणुका आणि डॉ.अभिजीत पाठक,सौ.दिप्ती आणि डॉ.नीरज करंदीकर,डॉ. प्रीती आणि डॉ. हेमंत देशपांडे,स्नायडर कंपनीचे अरविंद पारगावकर,डॉ.संगीता आणि डॉ.शिरीष कुलकर्णी,डॉ. मनोज घुगे डॉ.किशोर कवडे,डॉ. गणेश गव्हाणे,जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख,बुलढाणा येथे मनोरुग्णांवर मोठं काम करणारे डॉ.नंदू पालवे,डॉ.अंशू मुळे, निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष दगडखेर,विकास कावरे, डॉ, स्वाती घुले,यांनी आमिर खान यांच्याशी झालेल्या संवादात सहभाग घेतला.स्नेहालयाचे संस्थापक सदस्य आणि विश्वस्त राजीव कुमार सिंग यांनी सूत्रसंचालन केले.

No comments