यावल तालुक्यात शेतातील केबल चोरांचा बंदोबस्त होईल का? भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल :- तालुक्यातील चुंचाळ...
यावल तालुक्यात शेतातील केबल चोरांचा बंदोबस्त होईल का?
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल :- तालुक्यातील चुंचाळे व बोराळे शिवारातील गावाच्या हाकेच्या अंतरावर भररस्त्यावरील शेत परीसरात चोरीचे सत्र सुरूच असुन येथील शेतशिवार परीसरात काही दिवसा पुर्वी दहिगाव उपसरपंच देवीदास धांगो पाटील यांच्या सह परिसरातील शेतक-यांच्या शेतातून केबल स्ट्राटर ठिबकच्या नळ्यासह सुप्रीम कंपनीचे दहा पाईप अज्ञात भुरट्या चोरांकडून चोरी करण्यात आली होती याबाबत अनेकदा यावल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बिट हवलदार यांच्यासह थाने अंमलदार यांच्या कडे तक्रारीसाठी गेल्यावर उलट त्याच्या कडून फिर्याद दाखल करणाऱ्यांवरच प्रश्नांचा भडीमार करत असल्यामुळे कोणताच शेतकरी फिर्याद द्यायला पुढे येत नाही त्यामुळेच या भुरट्या चोरांची चांगलीच तेजी झाली आहे चुंचाळे येथील प्रकाश चौधरी,डिंगबर पाटील, दिनकर चौधरी यांच्या शेतातील देखील विहीर व ट्युबवेल वरील केबल साहित्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती यामुळे शेतकरी बांधवांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सतत होत असलेल्या चोऱ्यांमुळे शेतकरी प्रचंड हैराण झालेला आहे आधीच शेतातील पेरणी झालेल्या पिकांकडे रात्रीच्या लोडशेडिंगमुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे त्यात ह्या चोऱ्यांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे
गेल्या एक ते दोन महिन्यांपासून चुंचाळे व बोराळे गावासह तालुक्यात शेत परीसरात अशा भुरट्या चो-यांमध्ये वाढ झाली असुन पोलीस विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे
यापुर्वी देखील येथील चुंचाळे व बोराळे शेतशिवारात अशा घटना या एक ते दोन महिन्यात वारंवार झाल्या असुन पोलीसांना मात्र एकाही घटनेचा तपास लावता आलेला नाही. त्यामुळे परीसरात शेतकरी व ग्रामस्थांकडून पोलीस विभागाविषयी प्रंचड नाराजी व्यक्त केली जात आहे आतातरी संबंधित पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे

No comments