थोरगव्हाण येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळु वाटपला सुरुवात भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल ता यावल : महारा...
थोरगव्हाण येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळु वाटपला सुरुवात
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मनवेल ता यावल : महाराष्ट्र शासनाच्या घरकूल लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या "मोफत वाळू" योजनेला यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथून २३ मे रोजी औपचारिक सुरुवात करण्यात आली. घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे गोरगरिबांचे घर बांधण्याचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. या योजनेसाठी घरकूल मंजूर असलेले लाभार्थी पात्र असून महसूल विभागाकडून त्यांच्या नावाने अधिकृत पास देण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार रॉयल्टी आकारली जाणार नसली तरी रेती वाहतूक व छाननी खर्च लाभार्थ्याने स्वतः करावा लागणार आहे. वाळूचा वापर फक्त लाभार्थ्याच्या घरबांधणीसाठीच करता येणार असून, पास वर नमुद केलेल्या ठिकाणीच रेती पोहचण्यासाठी मुभा आहे.
मोफत वाळु वाटप योजनेच्या यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बा. का.पवार, यावल तहसिलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे मंडळ अधिकारी सचिन जगताप, तलाठी विजयसिंग पाटील, सरपंच मनिषा समाधान सोनवणे, उपसरपंच लताबाई पाटील, पोलिस पाटील गजानन चौधरी, ग्रामसेवक जय कोळी, कोतवाल विजय भालेराव, ग्रामपंचायत सदस्य सुर्यभान पाटील, सामाजिक कार्यकर्ता समाधान सोनवणे, बाळु पाटील, तुषार ठोसरे व रेती वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते.
थोरगव्हाण गावांमध्ये एकूण सुमारे ८६ घरकूल मंजूर झाल्याने आज प्रत्यक्ष ६ लाभार्थ्यांना वाळू वाटप करण्यात आली योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर अपेक्षित आहे. तापी नदी पात्रातील वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

No comments