एमआयडीसी रोडवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात; पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे काय? सचिन मोकळं...
एमआयडीसी रोडवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात; पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे काय?
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.23):-एमआयडीसी परिसरात वाहतुकीने नेहमीच कोंडी होत असते.त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते.त्यातच एमआयडीसी परिसरातील मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण काढण्यात पालिकेने सुरुवात केली आहे.परंतु एमआयडीसी परिसरातील रोडच्या कडेला बसणारे छोटे भाजी विक्रेते हे उदरनिर्वाहासाठी रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत असतात व त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो.त्यांचे ही अतिक्रमण संरक्षणामध्ये काढण्यात पालिकेने सुरुवात केली आहे.परंतु हे गोरगरीब भाजी विक्रेते जाणार कुठे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद पडले घर चालवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे,न्याय मागायचा तरी कुठे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


No comments