जि.प.उच्च प्राथमिक काजीपुरा शाळेचे कौतुकास्पद यश विश्राम तेले चौगाव ता.चोपडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण ...
जि.प.उच्च प्राथमिक काजीपुरा शाळेचे कौतुकास्पद यश
विश्राम तेले चौगाव ता.चोपडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभाग जिल्हा शिक्षण संस्थेमार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत जि प उच्च प्राथमिक शाळा काजीपुरा या शाळेस तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले
आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांना प्रमाणपत्र ट्रॉफी व एक लाख रुपयाचा धनादेश बक्षीस देण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यास
प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी अनिल विसावे गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे,चहार्डी केंद्राचे केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे,पंकज विद्यालयाचे ऊपाध्यक्ष पंकज बोरोले,काजीपुरा गावाचे सरपंच सूर्यकांत पाटील,उपसरपंच संजय पवार शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य भास्कर पवार शाळेतील शिक्षक वृंद प्रफुल्ल पाटील(मुख्याध्यापक)धनराज बडगे,दीपक पाटील,प्रफुल्लकुमार पाटील,सायली चौधरी उपस्थित होते.या यशासाठी रविंद्र पाटील कृ.ऊ.बा.स.चोपडा संचालक,रमेश सोनवणे ग्रा.प.सदस्य,सुरेश सोनवणे पोलिस पाटील,सुनिल पाटील अध्यक्ष शा.व्य.स.,अशोक भिल माजी अध्यक्ष शा.व्य.स.यांचे अनमोल सहकार्य लाभले शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे व सर्व शिक्षकवृंद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments