adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रवासी -मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक एका तरुणीचा जागीच मृत्यू इतर प्रवासी जखमी फैजपूर आमोदा रस्त्यावरील घटना

  प्रवासी -मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक एका तरुणीचा जागीच मृत्यू इतर प्रवासी जखमी  फैजपूर आमोदा रस्त्यावरील घटना  रावेर प्रतिनिधी मुबारक त...

 प्रवासी -मालवाहू रिक्षाची समोरासमोर धडक एका तरुणीचा जागीच मृत्यू इतर प्रवासी जखमी 

फैजपूर आमोदा रस्त्यावरील घटना 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज  रविवार दिनांक 4 मे रोजी  दीड वाजेच्या भर उन्हात फैजपूर ते अमोदा रस्त्यावर प्रवासी वाहतूक ॲपे रिक्षा MH 19 CW 3590)  आमोदा गावाकडून फैजपूर कडे येतांना व मालवाहू ॲपे रिक्षा MH 19 7064 फैजपूर कडून आमोदा कडे जात असतांना या दोन्ही रिक्षांची   आमनेसामने जबर धडक झाली दोन्ही रिक्षा पलटी होऊन या दोन्ही वाहनांच्या जोरदार धडकेतील अपघातात  प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲपे रिक्षात बसलेल्या तरुणीला या अपघातात आपले प्राण गमवावे लागले  तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे आणि रिक्षात बसलेले प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघात दुदैवी मयत झालेली तरुणी  अदिती सोपान खडसे ही रावेर तालुक्यातील सावदा शहरातील दंत चिकित्सक डॉ सोपान खडसे यांची कन्या होती  अपघातातील गंभीर जखमी  दुखापती झालेल्या जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेतून फैजपूर पोलिसांनी  स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत . याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.

No comments