adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छत्रपती संभाजी महाराज यांना आपला आदर्श माणून जगा :- सुदर्शन शिंदे

  छत्रपती संभाजी महाराज यांना आपला आदर्श माणून जगा :- सुदर्शन शिंदे   अमोल बावस्कार बुलढाणा  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मोताळा :- छत्रपती ...

 छत्रपती संभाजी महाराज यांना आपला आदर्श माणून जगा :- सुदर्शन शिंदे  


अमोल बावस्कार बुलढाणा 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मोताळा :- छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी मराहाज यांची स्वराज्य स्थापनेसाठी असलेली जिद्द, चिकाटी,नियोजन, गनिमीकावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला स्वाभिमान त्यांच्या शिव चरित्र, शंभु चरित्र वाचून त्यांनाच आपला जगण्याचा आदर्श माणून जगा कितीही संकट आले तर छत्रपती संभाजी महाराज यांना आठवा आणि पुढे चला असे प्रतिपादन शंभुचरित्रकार सुदर्शन शिंदे यांनी केले. 


ते तालुक्यातील गुगळी येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजीत व्याख्यानात बोलत होते.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण,दिप प्रज्वलन नंतर शुभम घोंगटे व गणेश शिंदे यांनी जिजाऊ वंदना म्हणत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

ते पुढे बोलतांना म्हणाले, माझ्या राजाने सुपारीच्या खांडाचे व्यसन केले नाही, पर स्त्री ला मातेसमान मानलं, रयतेच्या रक्षणासाठी जात,पात,धर्म,पंथ बाजूला सारून रयत हीच आपली जात माणून अठरापगड जातीला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याचा विचार हा आपला जगण्याचा आदर्श असला पाहिजे. आपल्याला वाटत असेल माझ्या पोटी संभाजी राजा जन्माला यावा तर बापाला सिह,आणि आईला जिजाऊ बनावं लागेल तेव्हा आपल्या पोटी छावा जन्माला येईल. वाघाच्या जबळ्यात घालुनी हात मोजती दात अशी जात ही अमुची पहा चाळुनी पाने आमुच्या इतिहासाची संभाजी महारांच्या युद्धनितीत एकही लढाई न हरणारा राजा छत्रपती संभाजी महाराज,वयाच्या न ऊ व्या वर्षी चार ग्रंथ लिहिणारा संभाजी महाराज संस्कृत पंडीत झाला तेवढा अभ्यास करुन आपणंही कलेक्टर आयपीएस सारख्या नोकऱ्या मिळवून संघटीत होऊन समाजिक कार्य करा असा महत्वाचा संदेश सुदर्शन शिंदे यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून दिला.

त्यावेळी मंचावर ॲड सतिषचंद्र रोठे,सिंदखेड सरपंच आप्पा कदम, युवासेना उप जिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, रा.कॅा.तालुका अध्यक्ष रामेश्वर पाटील, रा.कॅा.यु.तालुका अध्यक्ष गणेश शिंदे पाटील, कोऱ्हाळा सरपंच विजय बोडखे,गुगळी सरपंच रमेश वाघ,भागवत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन काकळे,आभार प्रदर्शन रामेश्वर पिसे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भागवत देशमुख, दिपक पाटील, विशाल पाटील, शुभम पाटील, अक्षय पाटील, श्रीकांत पाटील, सोपान पाटील, मुकुंदा पाटील, बंडु देशमुख, रमेश गार्वे, विकास किन्होळकर, प्रतिक देशमुख, अक्षय सांगळे, आकाश पाटील, सोपान पाटील आदिंनी सहकार्य केले.

No comments