adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्ज फेडण्यासाठी महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला तोफखाना पोलिसांनी केले जेरबंद

कर्ज फेडण्यासाठी महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला तोफखाना पोलिसांनी केले   जेरबंद   सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

कर्ज फेडण्यासाठी महागड्या मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला तोफखाना पोलिसांनी केले जेरबंद  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि११):-कर्ज फेडण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.शिवम सुधीर कांबळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या २ महागड्या मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत.यातील फिर्यादी दिनकर भास्कर जोरी यांच्या घराशेजारी नवनाथ मंदिरामध्ये हरिनाम सप्ताह चालु असल्याने फिर्यादी हे तेथे सेवेकरी म्हणून मदतीला जात होते.तेथे त्यांची शिवम नावाच्या इसमाशी तोंड ओळख झाली. शिवम हा फिर्यादीस साप्ताहमध्ये कामामध्ये मदत करत होता. दि.१७/०४/२०२५ रोजी शिवम याने फिर्यादीस बोल्हेगांव येथे कामानिमित्त जाण्यासाठी फिर्यादीची यूनिकॉन मोटार सायकल मागितली असता फिर्यादीने विश्वासाने त्याला मोटार सायकल दिली,परंतु शिवम कांबळे बराच वेळ झाला तरी परत आलाच नाही तसेच त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.यासंदर्भात फिर्यादीने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.गुन्हा दाखल होताच तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व इतर पोलीस अंमलदार यांना गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचा आदेश दिल्याने पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांनी व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी फिर्यादीशी संपर्क करुन मोटर सायकल घेवुन जाणा-या इसमाची माहिती घेवुन शिवम याला एम.आय.डी.सी परिसरातून ताब्यात त्याच्याकडे गुन्ह्यातील मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता,मी कर्ज फेडण्यासाठी मोटार सायकल चोरल्याचे सांगितल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

No comments