adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पावसाळ्यापूर्वी जनावरांची तपासणी व लसीकरण करा आ. अमोल जावळे यांच्या सूचना

  पावसाळ्यापूर्वी जनावरांची तपासणी व लसीकरण करा  आ. अमोल जावळे यांच्या सूचना भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पावसाळ्...

 पावसाळ्यापूर्वी जनावरांची तपासणी व लसीकरण करा  आ. अमोल जावळे यांच्या सूचना


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पावसाळ्याच्या तोंडावर जनावरांमध्ये ताप, गलगोट, तोंडखुरा, लम्पी स्किन अशा संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व जनावरांची आरोग्य तपासणी व लसीकरण तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यासाठी आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा व तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून आवश्यक ती कार्यवाही त्वरित हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार, गायी, म्हशी, बैल, बकरी यांसह सर्व प्रकारच्या जनावरांची वेळेवर तपासणी करण्यात यावी व संभाव्य रोगांची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करावेत.

तसेच जनावरांचे लसीकरण, जंतनाशक व अन्य औषधोपचार, गोठ्यांची स्वच्छता, कीटकनाशक फवारणी आदी प्रतिबंधात्मक उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही आमदार जावळे यांनी स्पष्ट केले.

“शेतकऱ्यांचे पशुधन हे त्यांच्या उपजीविकेचा कणा आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत. यासाठी पशुसंवर्धन विभागाने गावागावांत जनजागृती मोहीम राबवावी,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ग्रामपंचायत आणि पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देशही आमदार जावळे यांनी यावेळी दिले.

No comments