एमसीव्हीसी'ला ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी : संपादक हेमकांत गायकवाड राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा...
एमसीव्हीसी'ला ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेश
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :
संपादक हेमकांत गायकवाड
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल १३ मे रोजी ऑनलाइन घोषित झाला आहे. यावर्षीपासून २०२५-२६ या सत्रापासून अकरावीचे संपूर्ण राज्यातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान, वाणिज्य, कला शाखेचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने तर एमसीव्हीसी (एचएससी व्होकेशनल) शाखेचे प्रवेश जुन्या पद्धतीप्रमाणेच म्हणजेच ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या ४ शाखा असून यामध्ये विज्ञान, कला, वाणिज्य व एमसीव्हीसी शाखांचा समावेश आहे. सन १९८८-८९ पासून संपूर्ण राज्यात एमसीव्हीसी शाखेमध्ये कृषी, तांत्रिक, डेअरी, मत्स्य, प्यारा मेडिकल यासह सहा गटांत ३० विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. व्यावसायाभिमुख व प्रात्यक्षिकावर भर देऊन कौशल्य प्राप्त शिक्षण देण्याच्या उद्देशाने या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली. हा अभ्यासक्रम रोजगाराभिमुख असून बारावीनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. यामुळेहे अभ्यासक्रम लोकप्रिय ठरले आहे. या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ३० ते ४० असून प्रात्यक्षिकांवर भर देणारे आहे. तसेच अकरावी करीता हे अभ्यासक्रम व्यावसायाभिमुख व संगणकाचे ज्ञान मिळविण्यासाठी उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे कल वाढलेला आहे. शासनाच्या ६ मे २०२५ च्या परिपत्रकानुसार २०२५-२६ या सत्रापासून एमसीव्हीसी शाखेतील अभ्यासक्रमाकरिता जुन्या पद्धतीनुसार ऑफलाइन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे
No comments