शिक्षक दांपत्यास कोयत्याच्या धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद एलसीबी ची कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानग...
शिक्षक दांपत्यास कोयत्याच्या धाक दाखवून लुटणारी टोळी जेरबंद एलसीबी ची कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१५):-शिक्षक दांपत्यास कोयत्याच्या धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या टोळीतील 5 आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.बातमीची हकिगत अशी की,दि.06 मे 2025 रोजी फिर्यादी श्री.संदीप रामदास बोळीज (वय 45, रा.समतानगर, कोपरगाव,जि.अहिल्यानगर) हे त्यांच्या पत्नीसह मोटार सायकलवरून वैजापूर येथून कोपरगावकडे येत असताना अज्ञात आरोपीतांनी मोटार सायकलवर येऊन,फिर्यादीस आडवून त्यांचे मानेला कोयता लावून आरोपीतांनी फिर्यादी व त्यांचे पत्नीकडून सोन्याचे दागीने व मोबाईल जबरीने चोरून नेला.याबाबत कोपरगाव शहर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 140/2025 बीएनएस 309 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांना जिल्हयातील जबरी चोरीचे ना उघड गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेश दिलेले आहेत.त्यानुषंगाने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई.अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार गणेश लोंढे,फुरकान शेख, सोमनाथ झांबरे,रणजीत जाधव,विशाल तनुपरे, रमीजराजा आत्तार,प्रशांत राठोड,मेघराज कोल्हे व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमूण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.दि. 14 मे 2025 रोजी पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा राहुल केदारनाथ लोहकणे, रा.कोकमठाण,ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असून ते सध्या कोकमठाण चौफुली, कोकमठाण येथे असल्याची माहिती मिळाली.पथकाने मिळालेल्या माहितीवरून कोकमठाण चौफुली येथे जाऊन संशयीत इसमांचा शोध घेऊन ते मिळून आल्याने राहुल केदारनाथ लोहकणे,वय 20, रा.कोकमठाण,ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर,कुणाल अनिल चंदनशिव वय 19, रा.संवत्सर, ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर, निलेश बाळासाहेब भोकरे, वय 19, रा.संवत्सर, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर,प्रमोद कैलास गायकवाड, वय 19, रा.संवत्सर, ता.कोपरगाव,जि.अहिल्यानगर, एक विधी संघर्षित बालक,वय 17, रा.सडे रोड,कोकमठाण, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून प्रत्येकी एक मोबाईल व विधीसंषर्घित बालकाकडून गुन्हयात चोरलेला मोबाईल असे एकुण 6 मोबाईल, बजाज प्लॅटीना कंपनीची विनाक्रमांकाची मोटार सायकल असा एकुण 1,35,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगीतली. ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयांचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,श्री. वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर,श्री.शिरीष वमने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments