adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आमोदा गावाजवळ दोन ट्रक व एका आयसरचा भीषण अपघात; अपघातात १४ जण जखमी

  आमोदा गावाजवळ दोन ट्रक व एका आयसरचा भीषण अपघात; अपघातात १४ जण जखमी इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आमोदा या गावाजवळ फैजपूर...

 आमोदा गावाजवळ दोन ट्रक व एका आयसरचा भीषण अपघात; अपघातात १४ जण जखमी


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आमोदा या गावाजवळ फैजपूर भुसावळ रस्त्यावर मोर नदी जवळ आयशर ट्रक आणि अजून दोन ट्रक दि.२८ मे रोजी बुधवार रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला या अपघातात तब्बल १४ जण जखमी झाले आहेत तरी या रस्त्यावरील दीड तास वाहतूक ठप्प झाली होती या अपघात संदर्भात दि.२८ मे रोजी बुधवार रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.


यावल तालुक्यात आमोदा हे गाव आहे आमोदा गावापासून फैजपूर ते भुसावळ रस्त्यावर ही मोर नदी आहे या मोर नदीच्या पुढे मालवाहू ट्रक क्रमांक ( MH 18 BJ 8140) व दुसरा मालवाहू ट्रक क्रमांक ( MH 28 BB 9141) हे एकमेकाला ओव्हरटेक करत होते दरम्यान ओव्हरटेक करत असताना आयसर ट्रक क्रमांक ( UP 83 CT 8122) याला जाऊन धडकला आणि नंतर आयसर जाऊन धडकले या वाहनात मजूर होते या वाहनात मजूर चालक असे १४ जन जखमी झाले जखमींमध्ये एकनाथ कोळी, सोपान कोळी, मंगला सुरवाडे, रितिक पांडे, रामा तायडे, मधुकर कोचुरे, रंजना कोळी, सागर गाडे, माया जाधव, अमर जाधव, प्रमिला कोळी, सुशीला कोळी, नंदा गाडे, सचिन जाधव, यांचा सहभाग आहे दरम्यान अपघातानंतर या रस्त्यावर सुमारे दीड तास वाहतूक कोंडी झाली होती या अपघाताबाबत माहिती मिळताच फैजपूर पोलिसांचे पथक तेथे गेले व त्यांनी तातडीने जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात हलविले आहे तर या मार्गावरील रहदारी तरी सोडीत करण्यात आलेली आहे फैजपूर पोलिसात अपघाताची नोंद करण्याचे उशिरापर्यंत काम चालू होते.

No comments